WhatsApp Image 2023 07 09 at 3.49.10 PM

यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. मान्सून तळ कोकणात दाखल झाल्यानंतर आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका हा मान्सूनला बसला.

मान्सूनची गती मंदावली. त्यानंतर बिरपजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूननं महाराष्ट्र व्यापला. यंदा पाऊस उशिरा पडल्यानं पेरणीला देखील उशीर झाला आहे.

मात्र यातच आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा सुमारे 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मोसमी पावसावर एल निनोचं सावट आहे.

प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती निर्माण झाली आहे. एल निनो स्थितीमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

tc
x