WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

● मुंबईत संततधार तर राज्यातील काही भागात पावसाची हजेरी; आज कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट.

● NIA कडून राज्यातील ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश; पुण्यातील आयटी इंजिनियरसह चौघांना जणांना अटक.

● उध्दव ठाकरेंना मोठा धक्का : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश.

● आताच 44 प्लस आहे, आगे आगे देखो होता है क्या.. काही दिवसांनंतर पूर्णच राष्ट्रवादीच आमच्याकडे येईल; अनिल भाईदास पाटील यांचं वक्तव्य.

● शरद पवारांची आज येवल्यात सभा; पावसाळी वातावरणामुळं धुळे, जळगाव जिल्ह्यांचा दौरा रद्द.

● अमरनाथ यात्रेदरम्यान 9 यात्रेकरुंचा मृत्यू तर इतर 25 भाविक जखमी; खराब वातावरणामुळे बाबा बर्फानी यांची यात्रा तात्पुरती स्थगित.

▪️येत्या 17 जुलैपासून ते 04 ऑगस्ट 2023 पर्यंत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार, या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या निधीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

▪️ विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023 कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार असल्याचे निवडणुक आयोगाने म्हटले आहे.

▪️ मणिपूर हिंसाचारात अमेरिकेकडून हस्तक्षेपाची तयारी; काँग्रेसकडून केंद्रावर हल्लाबोल

▪️ प्रकाश जावडेकरांवर मोठी जबाबदारी; भाजपची निवडणूक प्रभारीपदं जाहीर

▪️ ईडीकडून मोठी कारवाई, मनिष सिसोदियांची ५२ कोटींची संपती जप्त

▪️ ‘वेड’नंतर जिनिलिया देशमुख झळकणार ‘ट्रायल पीरियड’मध्ये

▪️ राहुल गांधी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार; गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक; काँग्रेसची प्रतिक्रिया

▪️ एसटीत बऱ्याच वर्षांनी सीएनजी लालपरी दाखल, प्रदुषणमुक्त प्रवास आणि डीझेलची बचत

▪️पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला.

▪️राजकारणापासून 2 महिन्याचा ब्रेक, संतापलेल्या पंकजा ताईंनी जाहीर केला Work-Break.

▪️अर्थ खात्यासाठी अजित पवार आग्रही? शिंदे-फडणवीस-दादांची बैठक होण्याची शक्यता.

▪️NIA कडून राज्यातील ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश; पुण्यातील आयटी इंजिनियरसह चौघांना जणांना अटक.

▪️प्रकाश जावडेकरांचं प्रमोशन, तेलंगणाच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती.

▪️भाज्यांपाठोपाठ आता मसाल्यांचा भावही वधारला, दरात जवळपास दुपटीने वाढ.

▪️ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना कोट्यवधीच्या घोटाळ्यात जामीन मंजूर

▪️ शरद पवार यांनी तुम्हाला सह्यांचा अधिकार दिला, मग त्यांचे अधिकार अमान्य का करता? – जितेंद्र आव्हाड

▪️ओडिशा रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली या कारवाईत तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

▪️ प्रथितयश शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटीचा पहिला शैक्षणिक कॅम्पस आफ्रिकेमधील टांझानिया या देशात सुरू होणार आहे. यासंदर्भात भारत आणि टांझानिया दरम्यान झालेल्या करारानुसार आयआयटी मद्रासचा कॅम्पस झांजिबार मध्ये सुरू करण्यात येईल.

▪️ ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे झिरो बॅलन्स अकाऊंट उघडण्यासाठी एनसीसीचा स्टेट बँक ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार झाला त्यामुळे आता कॅडेट्सचा गणवेश भत्ता थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार.

▪️ मोठी बातमी ! मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 59,070 रुपये प्रति तोळा तर चांदी 72,300 रुपये किलो झाली आहे.

tc
x