माझ्या आईला कोणी पाहिलं का…??
मला माझी आई हवी आहे…
आई कुठं गेली असेल ती…??
वय – दोन वर्ष
आई… कुठे आहेस गं ??
मी शाळेला चाललोय…
अच्छा टाटा…
मला शाळेत तुझी आठवण येते गं…
वय – पाच वर्ष
मम्मा… लव यू…
आज टिफिनमध्ये काय आहे गं ??
आई आज शाळेतून खूप गृहपाठ दिला आहे…
वय – आठ वर्ष
बाबा, आई कुठे आहे…??
शाळेतून घरी आल्यावर आई दिसली नाही तर कसं तरी होतं…
वय – बारा वर्षे
आई बसना गं जवळ, मला खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी…
वय – चौदा वर्ष
काय गं आई, तू तरी समझ ना…
बाबांशी बोलना, मला पार्टीला जाउ दे म्हणून सांग ना गं…
वय – अठरा वर्ष
काय आई… जग बदलते आहे,
तू समजत नाहीयेस, तुला काहीच कळत नाही…
वय – बावीस वर्षे
आई… आई…
जेंव्हा बघावे तेंव्हा काय शिकवत असतेस मला…?? मी काय लहान बाळ आहे का आता…??
वय – पंचवीस वर्षे
ए आई… ती माझी पत्नी आहे…
तू समजून घे ना तिला…
तिला शिकवण्यापेक्षा तू तुझी मानसिकता बदल….
वय – अठ्ठावीस वर्षे
अगं आई… ती पण एक आई आहे,
तिला तिच्या मुलांना सांभाळता येते,
तू प्रत्येक बाबतीत लूडबूड करू नकोस…
वय – तीस वर्ष
आणि त्या नंतर…
आईला कधी विचारलं नाही…
आई कधी म्हातारी झाली त्याला कळलंच नाही…
आई तर आज पण तीच आहे…
फक्त वयानुसार मुलांचं तिच्याशी वागणं बदलत गेलं…
नंतर एक दिवस…..
आई . . . आई . . . . . गप्प का आहेस…??
बोल ना…??
पण आई काहीच बोलत नाही.
कारण ती कायमची गप्प झाली होती…
वय – पन्नास वर्षे
ती भाबडी आई… दोन वर्षांपासून पन्नास वर्षांपर्यंत लेकरातल हा बदलावं समजू शकली नाही…
कारण आईसाठी तिचा मुलगा पन्नास वर्षाचा प्रौढ झाला तरी लहानच असतो…
ती बिचारी तर शेवटपर्यंत त्या मुलाच्या लहान सहान आजारांवर पण तशीच तळमळते जशी तळमळ त्याच्या लहानपणी असायची….
आणि मुलगा…??
आई गेल्यावरच त्याला समजतं…
कि त्याने कोणता अमूल्य खजिना गमावला आहे…
पण तेव्हा रडून काहीच उपयोग नसतो…
😭😩😤😭😤😩😭
वयोमानानुसार बडबडणा-या वृध्द आई-बाबांना समजून घेता आले तर बघा…
एवढं जमलं तरी तुम्ही सुशिक्षित झालात असं समजा…
नाहीतर तुमच्या ढिगभर डिग्र्या काही कामाच्या नाहीत…
आपल्या आई बाबांना जिवापाड जपा…
त्यांची सेवा करा…
सेवा जमत नसेल तर केवळ आदर तरी करा, तो ही पुरेसा आहे त्या माऊलींना……
आणि एक विनंती, प्रत्येकाने ही पोस्ट नक्कीच शेअर करा… ह्यामुळे कोणाला तरी ह्या मोठेपणात विसर पडलेल्या आईची पुन्हा एकदा जाणीव होऊन जाईल… ते ही तुमच्यामुळे…
या खोट्या झगमगाटात, त्या आलीशान बंगल्यात तेव्हढं सुख मिळत नाही जेव्हढं सुख आपल्या आईच्या कुशीत डोकं ठेवल्यावर मिळालेलं असतं…
*खरंच… आई म्हणजे आईचं असते…!