WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

राज्यात कोरोनाचेरुग्ण वेगाने वाढत आहेत – शुक्रवारी १ हजार १५२ नवे रुग्ण आढळले – तर ४ जणांचा मृत्यू झाला

हवामान विभागाने सांगितले – उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यामध्ये सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे

काल १४ एप्रिल ला कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ ०.१७ टक्यानी वाढ झाली – त्यानुसार ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ८६.२४ डॉलर झाले आहे

तर आज सकाळी पेट्रोल चे दर 106.42 रुपये प्रति लिटर , तर डिझेल 92.92 रुपये प्रति लिटर झाले आहे

मद्य विक्री धोरण घोटाळा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होणार; अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी बजावले समन्स.

शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस 10 लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर 5 लाख रुपये ठेव सरकारने ठेवावी; स्वाभिमानी पक्ष सरकारकडे मागणी करणार.

राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी.

हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फुटी पुतळ्याचं अनावरण, प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम.

सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ; गेल्या 24 तासात 700 रुपयांची वाढ, प्रतितोळा दर 63 हजारांच्या पार.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून झाला मोठा अपघात, अपघातामध्ये सात ते आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर.

आता कोर्टाच्या कामात AI चा वापर होणार: कोर्टाच्या कामकाजात सुलभता यावी, याचिकाकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा अल्पवयीन मुलगा मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात.

कोरोनाचा धोका वाढला! देशात गेल्या 24 तासांत रुग्णसंख्या 11 हजारपार तर राज्यात कोरोनाच्या हजाराहून जास्त रुग्णांची नोंद.

हॅरी ब्रूकचे वादळी शतक, हैदराबादचा केकेआरवर 23 धावांनी रोमहर्षक विजय.

tc
x