
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 रुपयांचं नाणं लॉन्च करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे.
कसं असेल 75 रुपयांचं नवीन नाणं?
अधिसूचनेनुसार, 75 रुपयांचे नाणं गोल आकाराचं असून त्याचा व्यास 44 मिमी असेल. 75 रुपयांचं हे नाणं चांदी, तांबे, निकेल आणि झिंक या चार धातूंपासून बनवण्यात आलं आहे. या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असेल.

नाण्याच्या पुढील बाजूच्या मध्यभागी अशोक स्तंभ आणि सत्यमेव जयतेचा लिहिलेलं असेल. नाण्यावर देवनागरी लिपीत भारत आणि इंग्रजीमध्ये India असं लिहिलेलं असेल. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे चित्र कोरलेलं असेल.
नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे. तसेच भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत हे नाणं बनवण्यात आलं आहे.