WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● यंदा मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता त्यामुळे देशात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 96 टक्के इतका पाऊस पडणार : भारतीय हवामान विभागाची माहिती.

▪️ जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या न्यूरालिंकच्या ब्रेन चिप ट्रायलला एफडीएकडून मान्यता मिळाली आहे – त्यामुळे आता कॉम्प्युटर-मोबाईल मेंदूने कंट्रोल होणार तसेच यामुळे नेत्रहीनही मोबाईल पाहू शकतील.

▪️ मध्य मुबईत आज २७ मे ला माहीम, दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग,आणि परळमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून पुढील 26 तास पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहील.

▪️ भारतातील गुजरात, उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधील विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियातील दोन विद्यापीठांनी बंदी घातली आहे. व्हिसा फसवणुकीची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन या विद्यापीठांनी ही बंदी घातली आहे.

▪️ बंदी घातलेल्या दोन ऑस्ट्रेलियन विद्यापीठांपैकी एक व्हिक्टोरिया येथील फेडरेशन विद्यापीठ आहे तर दुसरे वेस्टर्न सिडनी विद्यापीठ आहे, जे न्यू साउथ वेल्समध्ये आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डने ही बातमी दिली आहे.

▪️ येत्या २८ मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या वास्तूचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनप्रसंगी ७५ रुपयांचे नाणे जारी करण्याची घोषणा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केली आहे.

▪️ २००० रुपयांच्या नोटा बदलल्यासाठी आरबीआयने 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. महत्वाचे म्हणजे आता तुम्हाला या नोटा पोस्ट ऑफिसमध्येसुद्धा जमा करता येणार आहे.

▪️ यावर्षी माॅन्सून वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी तर ईशान्य भारत, मध्य भारत आणि दक्षिण द्विपकल्प भागात सरासरी पाऊस सामान्य राहील. मात्र जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

● शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण जाहीर, शिक्षकांना रुजू अथवा कार्यमुक्त करण्याचे अधिकार जि.प. सीईओंना.

● विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेची बंपर कमाई; एका वर्षात 3.6 कोटी प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून वसूल केले तब्बल 2200 कोटी रुपये.

● समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन; नागपूर ते नाशिक सहा तासांच्या अंतरावर.

● निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो; पोलिसांचा दावा.

● बीजापूर पोलिसांची कारवाई; छत्तीसगढमध्ये नोटा बदलण्यासाठी आलेल्या दोन नक्षल्यांना अटक, नक्षलवाद्यांकडून सहा लाखांची रोकड, 11 बँक पासबुक आणि सरकारविरोधी नक्षल पत्रकांसह एक दुचाकी वाहन जप्त.

● आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना 22 जागा लढवणार; दीपक केसरकर यांची माहिती.

● संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वाद; सुप्रीम कोर्टाने विरोधी पक्षांची याचिका फेटाळली.

● IPL 2023 : गुजरातमध्ये मुंबईचे पॅकअप, गिलचे शतक आणि मोहित शर्माच्या 5 विकेट्सच्या जोरावर गुजरातचा मुंबईवर 61 धावांनी दणदणीत विजय; आता चेन्नईसोबत फायनल.

tc
x