दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 02/5/23

◼️“मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, कारण…”, शरद पवारांची मोठी घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली आहे.

◼️“अजितदादांबद्दल ज्या चर्चा होत्या…”, शरद पवारांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांच्या कुटुंबातील…”
शरद पवारांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया.

हे ही वाचा : – शेतकरी पेन्शन योजना फ्लॉप होण्याच्या मार्गावर

◼️विदर्भात महाविकास आघाडीला बळ तर सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली, बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कौल
तालुकापातळीवरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीतील जय-पराजयावरून आजी-माजी आमदारांच्या राजकीय ताकदीचे मुल्यमापान होत नसले तरी राजकीय वारे कोणत्या दिशने वाहत आहेत यांचा अंदाज मात्र निश्चित येतो.

◼️बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार! दोन पक्ष, दोन नेते आणि तीन राजीनामे; असे निर्णय ज्यांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले
शरद पवार यांच्या या निर्णयानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील घेतलेल्या अशाच निर्णयांचे स्मरण केले जात आहे.

हे ही वाचा : – “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे

◼️ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे उपोषण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केला आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे.

◼️कल्याण : सफाई कामगारांनी प्रभाग स्तरावर बदली आदेश बदलल्यास कठोर कारवाई, घनकचरा उपायुक्त अतुल पाटील यांचा इशारा
सफाई कामगार मूळ विभागात हजर झाल्यानंतर प्रभागस्तरावर साहाय्यक आयुक्तांशी संधान साधून ‘सोयीचे’ काम सुरू करत आहेत. अशा सफाई कामगारांना घनकचरा उपायुक्तांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा : – महाराष्ट्र दिनी राज्यात 317 ‘आपला दवाखाना’ सुरु मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

◼️सलमान खानच्या सुरक्षेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “भारतात व मुंबईत…”
लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला सतत मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या सुरक्षेबाबत वक्तव्य केले आहे.

◼️“ए आर रेहमान श्रीकृष्णासारखा दिसायचा…” गुलजार यांनी सांगितली एक खास आठवण
मुलाखतीदरम्यान गुलजार, मणीरत्नम आणि एआर रेहमान यांनी त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी शेअर केल्या

हे ही वाचा : – एक आनंदाची बातमी आहे.!! तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल तर आता….

◼️नुकतंच ‘फिल्म कंपॅनीयन’ या युट्यूब चॅनलच्या एका मुलाखतीमध्ये या तिघांनी हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान गुलजार, मणीरत्नम आणि एआर रेहमान यांनी त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी शेअर केल्या. या आठवणींपैकी गुलजार यांनी रेहमानबद्दलची एक खास आठवण शेअर केली.

◼️अनुपमा चोप्रा यांनी ‘सदमा’ चित्रपटादरम्यान रेहमान आणि गुलजार यांची भेट झाल्याची आठवण करून देताना त्यावेळी गुलजार यांना काय वाटलं याबद्दल विचारलं. तेव्हाची नेमकी आठवण गुलजार आणि रेहमान यांना दोघांना आठवणं कठीण असल्याने त्यांना त्या भेटीबद्दल फारसं काहीच बोलता आलं नाही, पण गुलजार यांनी रेहमानबद्दल एका वेगळ्या गोष्टीचा खुलासा केला.

◼️गुलजार म्हणाले, “मला नेमकं ती घटना आठवणं कठीण आहे पण मला एक गोष्ट चांगली आठवते ती म्हणजे जावेद अख्तर यांनी रेहमानबद्दल एक छान गोष्ट मला सांगितलेली. त्यावेळी रेहमानचे केस हे कुरळे होते. तेव्हा जावेद अख्तर म्हणाले की तो लहान मुलगा आहे तो बालक भगवान म्हणजेच भगवान श्री कृष्णासारखा दिसतो.” गुलजार यांनी ही आठवण सांगितल्यावर बाकीच्यांनीही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

◼️France Violence : कामगारदिनी पॅरिसमध्ये हिंसाचार, १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी
फ्रान्सच्या पॅरिसमध्ये निवृत्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

◼️“हवं तर मला फासावर लटकवा पण…” बृजभूषण सिंह यांचं आंदोलक कुस्तीगीरांना हात जोडून आवाहन
२३ एप्रिलपासून जंतरमंतर या ठिकाणी सुरू आहे कुस्तीगीरांचं आंदोलन, बृजभूषण सिंह यांना हटवण्याची एकमुखी मागणी

◼️जे. जे. रुग्णालयामध्ये चार नवे अभ्यासक्रम सुरू होणार
इमर्जन्सी मेडिसिन, इंटरव्हेशन रेडिओलॉजी, जेरिॲट्रिक आणि इम्युनो हिमेटोलॉजी ॲण्ड ब्लड ट्रान्सफ्यूजन हे चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

◼️अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल सर्वसामान्यांसाठी खुले करा- भाजपची मागणी
अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात नियम धाब्यावर बसवून अनियमितता सुरू असून कोणाच्या तरी बालहट्टापायी येथील मैदान सहा महिन्यांकरिता फुटबॉलसाठी आरक्षित केल्याचा आरोप आमदार अमित साटम यांनी केला आहे.

tc
x