WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

■ खुशखबर! राज्यातील 36 जिल्ह्यांत 6 मे ते 6 जून 2023 दरम्यान करिअर शिबिरांचे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार विविध अभ्यासक्रमांची व नवीन संधींची माहिती

■ आता इयत्ता सहावीपासून शिकवले जाणार AI आणि Coding; लवकरच सीबीएसई अभ्यासक्रमात होणार समाविष्ट

■ शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी खिलारवाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्र

▪️ मोठी बातमी ! बंगालच्या उपसागरात निर्माण होणार मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ. 11 ते 15 मे दरम्यान हे चक्रीवादळ बंगलादेश किनारपट्टीला धडकणार त्यामुळे या काळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

▪️ ब्रेकिंग ! शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही. तसेच नवा अध्यक्ष कोण होणार हे पक्षातील वरिष्ठांनी ठरवाव – अशी घोषणा शरद पवार यांनी केली

▪️ ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमावर टीका आणि मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यामुळे मुस्लिम युथ लीगने ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाची कथा खरी असल्याची सिद्ध करणाऱ्याला एक कोटी देणार असल्याची घोषणा केली आहे.

▪️ महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर एसटी महामंडळाच्या सदिच्छा दूत अर्थात Brand Ambassador म्हणून मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते मकरंद अनासपुरे यांची निवड करण्यात आली आहे.

▪️ याआधी सन २००३ मध्ये एसटी महामंडळाचे Brand Ambassador म्हणून ज्येष्ठ अभिनेते स्व. विक्रम गोखले यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. दरम्यान आता तब्बल २० वर्षांनी त्या जागी मकरंद अनासपुरे यांची निवड करण्यात आली आहे.

■ महत्वाची बातमी:जून 2024 पर्यंत शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण – जगदीश कदम, शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांना विशेष सवलत

■ ग्वाही:बंगळुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविणार – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमूख

■ तुकाराम मुंढेंचा वनवास संपला, कृषी खात्यात अतिरिक्त मुख्य आयुक्तपदी नियुक्ती

● भारताच्या पूर्व किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका; या वर्षीचे पहिले चक्रीवादळ ओडिशाला धडकणार, येत्या 48 तासात बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता.

● केदारनाथ यात्रेला ब्रेक : खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रेचं रजिस्ट्रेशन 3 मे पर्यंत थांबवलं, प्रशासनाचा निर्णय.

● शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय; कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध

● शरद पवार यांनी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही; काँग्रेसच्या वतीने नाना पटोले काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर.

● प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन, कामगारांसाठी स्वतंत्र रुग्णालयं; कामगार मंत्री सुरेश खाडेंच्या मोठ्या घोषणा.

● कर्नाटकात भाजपला धक्का, काँग्रेस बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता; एबीपी-सी वोटरच्या महाओपिनिअन पोल सर्व्हेचा अंदाज.

● गो फर्स्ट एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर, 3 आणि 4 मेची सर्व उड्डाणे रद्द; कंपनीला इंजिनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचं सांगत कंपनीने दिवाळखोरी घोषित करण्यासाठी NCLT कडे केला अर्ज.

● IPL 2023 GT vs DC : हार्दिक पांड्याची नाबाद अर्धशतकी खेळी व्यर्थ, दिल्ली कॅपिटल्सचा गुजरातवर 5 धावांनी विजय.

tc
x