WhatsApp Image 2023 09 02 at 1.47.58 AM

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा…

🏏श्रीलंकेत होत असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. या स्पर्धेतील भारत व पाकिस्तान संघातील सामना पालेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रीडा प्रेमींना लागली आहे.

दोन्ही परंपरागत प्रतिस्पर्धी संघ
भारतीय फलंदाजांची मजबूत फळी व पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचा मारा यांचे द्वंद्व हा या सामन्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भारत व पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी संघ आहेत. या सामन्यातील विजयी जल्लोषाचा ‘मोका’ कोणाला मिळणार हे आज सायंकाळी ठरेल. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. 

हे ही वाचा : – Asia Cup Time table: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आता संपूर्ण आशिया कप पाहू शकता अगदी मोफत

💁‍♂️ पाकिस्तानची भिस्त गोलंदाजीवर
पाकिस्तानची मुख्यत: गोलंदाजांवर भिस्त असेल. शाहीन, नसीम आणि रौफ हे त्रिकूट सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे. या तिघांनी मिळून या वर्षी ४९ गडी बाद केले आहेत. तसेच लेग-स्पिनर शादाब खानही लयीत आहे. रोहित आणि गिल भारताच्या डावाची सुरुवात करणे अपेक्षित असून कोहली तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करण्याची शक्यता आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन मुख्य दावेदार आहेत. अखेरच्या षटकांत फटकेबाजीची जबाबदारी हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा या अष्टपैलूंवर असेल. तसेच त्यांना गोलंदाजीतही योगदान द्यावे लागेल.

हे ही वाचा : – ICMR ने कोरोना संसर्ग रुग्णांबाबत महत्त्वाचा अहवाल; कोरोना व्हायरस आजाराची नंतरची लक्षणे कोणती?

Channels available on the Hotstar app

  • Life Ok
  • Fox life
  • Fcroll.in
  • HBO Originals
  • Showtime
  • Hooq
  • Abc studio
  • National Geography

👉चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवसह जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि सिराज हे वेगवान त्रिकूट या सामन्यात खेळणे अपेक्षित आहे.

tc
x