🤔 साडेतीन मुहूर्त म्हणजे काय?
🛕 साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण अक्षयतृतीया तोंडावर येऊन ठेपला आहे. पण या सणाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण का म्हणतात? मुळात साडेतीन मुहूर्त म्हणजे नक्की काय? समजून घेऊयात.
🤔 साडेतीन मुहूर्त म्हणजे काय?
💁🏻♂️ कोणतेही काम करण्याआधी आपण शुभ मुहूर्त काढत असतो, पण आपल्या हिंदू धर्म शास्रात अशा काही निवडक तिथी आहेत कि त्या दिवशी कोणत्याही कार्याला सुरुवात करताना मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. या मुहूर्ताला ‘स्वयं सिद्ध मुहूर्त’ असे म्हणतात. असे हे ‘स्वयं सिध्द मुहूर्त’ हिंदू धर्म शास्रात साडे तीन सल्याचं म्हटलं आहे.. त्यालाच आपण साडेतीन मुहूर्त असे म्हणतो
🤔 साडेतीन मुहूर्त कोणकोणते आहेत?
✨ साडेतीन मुहुर्तात गुढीपाडवा, अक्षयतृतीया, विजयादशमी (दसरा) हे सण संपूर्ण एक मुहूर्त म्हणून गणले जातात तर बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त म्हणून गणला जातो.
सहकार्य करा इतरांना नक्की शेअर करा