आजच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट 1/5/23

अवकाळीचा मुक्काम वाढला : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज, विदर्भ आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट.

भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमेवर लष्कराच्या तोफखाना युनिटमध्ये प्रथमच महिला लष्करी अधिकारी तैनात.

कोणतेही सरकार जनतेचे नुकसान व्हावे असे कामं करत नाही – बारसूमधल्या रिफायनरी प्रकल्पाबद्दल राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी मत व्यक्त केले

सुदानमध्ये संघर्षामुळे चारशेहून अधिक लोकांचा मृत्यू; गोळीबार सुरुच

बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या सात्विक-चिराग जोडीला सुवर्ण पदक

8 हजार169 पदे भरणार:MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठी भरती; पूर्व परीक्षा सुरळीत, 80 टक्के विद्यार्थी उपस्थित

महाराष्ट्राने पुनश्च दाखवले की, इथे गद्दारीला स्थान नाही, हेच येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी दाखवायचे- आदित्य ठाकरे

देशात कोरोना रुग्णसंख्या घटली, पण मृत्युदर कमी होईना; केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 5 महिन्यांत 40,000 हून अधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन; सीटबेल्ट न लावता वाहन चालवण्याच्या 6,000 हून अधिक घटना

जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी पंतप्रधानांना ‘…आमची पण मन की बात ऐका’ अशी आर्जवी विनंती केली.

पुण्यामध्ये होणाऱ्या संगीतकार AR रेहमान म्युझिकल नाईटच्या आधी पोलिसांनी केली ड्रग्ज डिलरवर कारवाई. सव्वा दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त.

भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, तर 10 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश.

महाराष्ट्र दिनी पोलिसांची मोठी कारवाई : गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार.

IPL 2023 MI vs RR : यशस्वी जयस्वालची शतकी खेळी व्यर्थ; मुंबईचा राजस्थानवर 6 गडी राखून शानदार विजय.

tc
x