कर्ज कोणत्या कामासाठी मिळते?

कर्ज कोणत्या कामासाठी मिळते?


उद्योगिनी योजनेंतर्गत बांगड्या बनविणे, ब्यूटी पार्लर, बेडशीट आणि टॉवेल बनविणे, बुक बायंडिंग, नोटबुक बनविणे, कॉफी आणि चहा बनविणे, कापूस धाका उत्पादन, रोपवाटिका, कापड व्यवसाय, दूग्ध व्यवसाय, पोल्ट्री संबंधित व्यवसाय, डायग्नोस्टिक लॅब व्यवसाय, ड्रायक्लिनिंग लॅब व्यवसाय, ड्रायक्लिनिंग, सुक्या मासळीचा व्यापार, खाद्यतेलाचे दुकान, नायलॉन बटण उत्पादन, जुने पेपर मार्ट, पापड निर्मिती यांच्यासह विविध व्यवसायांसाठी उद्योगिनी योजनेंतर्गत महिलांना पाच लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते.

आवश्यक कागदपत्रे :
– अर्जासोबत पासपोर्ट दोन फोटो
– आधार कार्ड
– दारिद्रयरेषेखालील व्यक्तीचे रेशनकार्ड
– उत्पन्नाचा दाखला
– रहिवासी दाखला
– जन्म दाखला
– जात प्रमाणपत्र
– बँक खाते बुक


अर्ज कसा करावा:

  • संबंधित जिल्हा उद्योग केंद्रातून अर्ज फॉर्म मिळवा.
  • आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण केलेला अर्ज जमा करा.
  • अर्जाची तपासणी झाल्यावर आणि पात्रता निकष पूर्ण झाल्यास कर्ज मंजूर केले जाते.

महिला उद्योगिनी योजना ही महिलांसाठी त्यांच्या स्वप्नातील व्यवसाय सुरू करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याची एक उत्तम संधी आहे.

अधिक माहितीसाठी

टीप: हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की योजना आणि पात्रता निकष राज्यानुसार बदलू शकतात. अधिक माहितीसाठी, कृपया तुमच्या जवळच्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधा.

tc
x