आम्ही लेकी सावित्रीच्या
ती गं आमुची माऊली !
करून साक्षर आम्हा
दिली ज्ञानाची सावली !!
चुल आणि मुल हेच
होतं मर्यादित जीणं!
देण्या स्वातंत्र्य आम्हा
केलं गं जिवाचं रान !!
धोंडेगोटे,माती,शेणं
झेललं गं अंगावर!
उघडले आम्हासाठी
शिक्षणाचे महाद्वार!!
शिक्षणाची देवता ती
अनंत गं उपकार!
पण करीतो गं आम्ही
सरस्वतीचा उद्धार !!
खोटया इतिहासाला
बळी पडीतो सतत !
आठवा त्याग तीचा
ज्ञान करा अवगत !!
अंधश्रद्धा अंधरुढी
अजुनही फोफावती !
ग्रह,पंचाग,कुंडली
आम्हा दाखवीते भीती !!
द्या गं सगळे सोडून
दावा आम्ही तीच्या लेकी !
ठेवा ज्योतीला तेवत
दाखवा आपली एकी !!
सौ.संध्या बी चव्हाण ✍️
बुलडाणा 💦