Zilla Parishad Recruitment: २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना शुल्क परत मिळणार; जाणून घ्या तपशील…

जिल्हा परिषद भरती २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना पुणे जिल्हा परिषदेकडून शुल्क परत करण्यात येणार आहे. त्यासाठीची माहिती उमेदवारांनी भरण्यासाठी जिल्हा परिषदेने संकेतस्थळ खुले केले आहे.

हे पण वाचा- Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती

पुणे : जिल्हा परिषद भरती २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना पुणे जिल्हा परिषदेकडून शुल्क परत करण्यात येणार आहे.
त्यासाठीची माहिती उमेदवारांनी भरण्यासाठी जिल्हा परिषदेने संकेतस्थळ खुले केले आहे. जिल्हा परिषद भरती २०१९ रद्द करण्यात आली होती. त्यामुळे त्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परताव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र राज्य शासनाकडून जिल्हा परिषदांना शुल्काची रक्कम देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेकडून उमेदवारांच्या शुल्क परताव्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी https://maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन परीक्षा शुल्क परताव्यासाठीची आवश्यक माहिती सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रक्रिया करून उमेदवारांना परीक्षा शुल्क परतावा केला जाजाणार आहे. परीक्षा शुल्क परताव्यासंदर्भात उमेदवारांसोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हे पण वाचा- MPSC: आधिकरी व्हायचयं! ‘एमपीएससी’तर्फे ६१५ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात, अशी राहणार परीक्षेची पद्धत…

tc
x