Working Women Yearly Horoscope2023 : नोकरदार महिलांना राशीनुसार पगारवाढ कधी मिळणार? घरच्या स्त्री ला कुटुंब साथ देईल का? पाहा १२ राशींचं भविष्य

Working Women Rashi Bhavishya: यंदा तुम्हाला लक्ष्मीची साथ लाभेल का? पगारवाढीचा योग कधी? ज्योतिष अभ्यासक व टॅरो कार्ड रीडर जयंती अलूरकर यांच्याकडून जाणून घेऊयात.

Working Women Yearly Horoscope: वर्किंग वुमन अर्थात नोकरदार किंवा कष्टकरी महिलांना घर आणि नोकरी अशा दोन्ही आघाड्या सांभाळाव्या लागतात. त्यामुळे कधी ओढाताण तर कधी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. म्हणूनच त्यांचा भार हलका करण्यासाठी आणि वाटचालीत नेमकी कशाची काळजी घ्यायची हे त्यांना कळावे यासाठी आम्ही टॅरो कार्डनुसार त्यांचे राशीभविष्य काय असेल ते सांगत आहोत.

मेष (Aries Zodiac)
नोकरदार महिलांनी यार्षी आपल्या रागावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कामाचा भार वाढणार आहे. प्रमोशन किंवा बढती साठी आणखी थोडा वेळ आहे. घाईघाईत उतावीळ होऊन केलेली कामे बिघडण्याचीच शक्यता अधिक आहे. शांत राहून कामावर लक्ष केंद्रित करा. गोष्टी पूर्ण समजून घेऊन नंतरच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करा. सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी वागताना तारतम्य ठेवा. आर्थिक बाजू चांगली राहील.

वृषभ (Taurus Zodiac)
व्यवसाय व नोकरी करणाऱ्या बायकांना घसघशीत यश मिळणार आहे. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमांमुळे सर्वत्र कौतुक होईल, आर्थिक भरभराट होईल. दूरदृष्टी, चिकाटी, कष्ट व कामावरचे लक्ष्य ढळू देऊ नका किंबहुना वाढवा. मात्र मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका.

मिथुन (Gemini Zodiac)
आपल्या वागण्या-बोलण्याचा ठसा इतरांवर पडत असल्यामुळे त्यावर विशेष लक्ष द्या. कोणालाही दुखवू नका, अपमानित करू नका. यशाच्या शिखरावर जाण्याकरता चुकीचा मार्ग निवडू नका, अन्यथा बदनामी संभवते. परदेशात नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल, तर ती सुसंधी वर्षाच्या अखेरीस आहे. तोपर्यंत दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

इथे पहा :- कर्क , सिंह , कन्या , तूळ ,वृश्चिक ,धनु , मकर , कुंभ मीन


tc
x