Whatsapp new feature : आता एकाच नंबरवरून चालणार चार मोबाईलमध्ये WhatsApp… कसं …

आता व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन अपडेट घेऊन आले आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. फेसबुक पोस्टवरून त्यांनी या नवीन फीचर बद्दल माहिती दिली आहे.

whatsapp एकाच वेळी चार डिव्हाईसवर लॉग इन करता येणार :
आता वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप फीचरच्या मदतीने आपले whatsapp अकाउंट हे एकाच वेळी चार डिव्हाईसवर लॉग इन करता येणार आहे.

या नवीन फीचरमध्ये प्रत्येक लिंक केलेले डिव्हाईस हे स्वतंत्रपणे काम करणार आहे. तसेच प्रायमरी डिव्हाइसमध्ये नेटवर्क नसताना सुद्धा वापरकर्ते दुसऱ्या डिव्हाईसवर अकाउंट Access करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनेक प्रकारे लिंक केले जाऊ शकते.

जर तुम्हाला तुमचे प्रायमरी डिव्हाईस इतर डिव्हाईसवरील व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटशी कनेक्ट करायचे असेल तर, तुम्हाला दुसऱ्या डिव्हाइसच्या whatsapp application मध्ये तुमचा फोन नंबर समाविष्ट करावा लागेल.

त्यानंतर तुमच्या पहिल्या डिव्हाईसवर एक ओटीपी येईल, तो तिथे ​टाकणे आवश्यक असणार आहे.

tc
x