१) सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडु नये, कारण ब्रम्हाडांचे, तसेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक आहे…. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात.🏵️
२) दाराशी गाय आल्यास तीला पोळी, अन्न, गुळ न देता हाकलू नये – कारण गाय आपले दोष, कट घेण्यासाठी येते.
३) आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे कींवा मुके जनावर यांना जरुर द्यावे. पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते.
४.) दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडुन पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस, मुक्या जनावरास पाणी देणे, पाजणे हे महद़ पुण्य आहे.
५ ) रस्त्यावर वृध्द, अंध, अंपग, आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरुर करावी, ह्या सारखी पुण्य कमवण्याची संधी नाही.
६.) महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, ऊभा ठेवू नये, झाडु हे लक्ष्मीचे प्रतिक आहे, त्याचा मान ठेवावा.
७.) मिठ सांडल्यावर त्याचेवर पाय पडु नये म्हणून ते स्वच्छ भरुन पाण्यात टाकावे, मिठ समुद्रात असते, समुद्रापासुन मिळते ,लक्ष्मी समुद्र कन्या आहे, लक्ष्मी आणि मीठाचा फार जवळचा संबंध आहे.
८.) भर सांयकाळी घरातून तिन वस्तू कुणाला देवू नये, मिठ, पैसे, झाडू, ह्या वस्तु लक्ष्मी कारक आहे आणि आपण संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून जाऊ देवू नये .
९. ) तसेच दुध, दही, आणि ताक ह्या वस्तु गायी पासुन प्राप्त होतात म्हणून ह्या ही लक्ष्मी स्वरूप आहे, त्या वस्तू संध्याकाळी कुणास देवू नये (बाहेर काढू नये).
१०.) आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापना ठेवू नये, देव्हार्या जवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरुर असावी, नारळ सोलून कलशावर ठेवावा ,त्यास शेंडी ठेवावी ,उजव्या बाजूला दीपक ठेवावा,
११. )पुर्वी काही घरांमध्ये बहिणीचे, भावांचे कींवा नातेवाईकांचे मुल स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत, नंतर ते मुलं दुकान, शेती ,व्यापारात घरच्या प्रमाणे मदत करीत, अर्धे आयुष्य एकत्र जात असत, काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये, (त्यांचे इच्छे शिवाय) कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते.
१२. ) एकत्र कुटुंबपद्धती मध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देवु नये किंवा विभक्त जाऊन राहू नये.
१३.) घरातील वडीलधार्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी, कुणी आपणास मदत केलीली विसरु नये, कुणाशीही कपट, कारस्थाने करून वागू नये.
१४. ) सकाळी लवकरच उठावे,महीलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सुर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धुप दीप लावावे, सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा, जसे तुळशीला पाणी, दिवा लावून मग चहा घ्यावा. ,हे सकाळी लवकर करावयाचे कांम, मग दिवसभर आपल्या पद्धतीने कामं करावेत.
१५.) महिला आणि पुरूष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी, थोड्या वेळाने करावयाचे कामं आत्ताच करुन मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाणे वाटणार नाही, रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही, पण आवड ठेवून झटपट कामं केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांती ही नांदते.
१६.) वरिल पद्धतीत थोडेफार नियमाचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी वरिल उपाय खूप महत्त्वाचे आहे…
🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा…!!!
🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका…!!!
🌺समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा…!!!
🌺”प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा”…!!!🙏
शक्य झाल्यास ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा
This post was last modified on %s = human-readable time difference 3:21 pm