
weather update 2025
weather update 2025: मान्सूनची दणदणीत एन्ट्री! महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असून सोमवारचा दिवस काही जिल्ह्यांसाठी चिंतेचा ठरणार आहे. हवामान विभागाने सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Table of Contents
कोकणात मान्सून सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले असून, यंदा मान्सून नेहमीपेक्षा १२ दिवस आधी राज्यात दाखल झाला आहे. केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री होताच केवळ २४ तासांत कोकणातही मान्सूनने हजेरी लावली. गेल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक भागांमध्ये प्री-मान्सून सरी कोसळत आहेत.
weather update 2025 : रविवारी पुणे, मुंबई, बारामतीसह अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. बारामतीत तर ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कोकणात पावसाची संततधार सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या भरून वाहत आहेत.
हे ही वाचा : भारताने रचला इतिहास; जगात चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
weather update 2025 : सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे भीमा व नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सध्या नीरा नदीतून ३०,००० क्यूसेक पाणी भीमा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे पंढरपूर परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, जुना ब्रिटीशकालीन पूल पाण्याखाली गेला आहे. नदीकाठच्या मंदिरांनाही पाण्याचा वेढा आला आहे.
मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. जे.जे. उड्डाणपुलावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुढील दोन तास मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागांमध्ये घरात आणि शासकीय रुग्णालयात पाणी शिरले आहे.
weather update 2025 : विदर्भातही गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, उन्हाळी मुगाच्या काढणीवर विपरीत परिणाम झाला आहे. मराठवाड्यातही पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव भागात सध्या पावसाला विश्रांती मिळालेली आहे.