Weather Update 2024 : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र अद्यापही महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावत आहे.
अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यामध्ये पुढील तीन दिवस म्हणजे 23 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण
हेही वाचा : आता घरबसल्या काढा आपल्या शेतजमिनीचा नकाशा
हेही वाचा : शिधापत्रिकाधारकांना मिळणारी योजना बंद