weather update : पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज, जुलै महिन्यात कसा राहणार पाऊस ? ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता..!
पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. दरम्यान, पंजाबरावांनी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे 1जुलै, 2 जुलै आणि 3 जुलै रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे.
यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधील सर्व आवश्यक कामे आवरून घ्यावीत. कारण महाराष्ट्रात 4 जुलैपासून अगदी मुसळधार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज पंजाबराव यांनी मांडला आहे.
कसा असेल पावसाचा जोर ?
● पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, 4 जुलैपासून ते 10 जुलै पर्यंत राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
● या कालावधीत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोरदार पाऊस पडणार आहे.
● यावर्षी पूर्वेकडूनच पाऊस दाखल झाला असल्यामुळे महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस होणार आहे.
● अहमदनगर, बीड, सोलापूर, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ सहित संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा चांगला जोर असेल.
हे ही वाचा : – कुणाला मिळणार 3 सिलेंडर मोफत तुम्हाला भेटतील का पहा
हे ही वाचा : –सोप्या भाषेत समजून घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना येथे पहा