पावसाचा हवामान खात्याचा अंदाज : जून महिना अर्धा उलटून गेला तरी अद्याप पावसाची शक्यता नाही. यंदा मान्सूनचे महाराष्ट्रात ११ जून रोजी आगमन झाले. मात्र, अजूनही पाऊस झालेला नाही. त्यामुळे आगामी खरीप हंगाम (पावसाळा) अद्याप सुरू झालेला नाही.
केवळ कापूसच नाही तर इतर वाणही कोरडवाहू भागात उगवले नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला आहे. मात्र आता याच दरम्यान पावसाचे आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. () हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उद्या शुक्रवार, 23 जून रोजी राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : – Weather update : राज्यात ‘या’ तारखेपासून मुसळधार पावसाचे आगमन,पण ….पंजाबराव डख काय सांगतात येथे पहा…..
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडू शकतो. 24 आणि 25 जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या पुणे विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.