weather update : महाराष्ट्र राज्यात दुहेरी संकट! कुठे गारपीट तर कुठे उष्णता जाणून घ्या हवामान अंदाज

महाराष्ट्र राज्यात एका बाजुला अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असताना उन्हाची तीव्रताही वाढली आहे. रविवारी राज्यात कमाल ३९ डीग्री तापमानाची नोंद झाली.

महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात तापमान ४० अंशावर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय. यामध्ये हिंगोली, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये तापमानात जास्त वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

तापमान वाढीसह १९ एप्रिल रोजी वीजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आलीय. सध्या पावसाचे ढग हे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या दिशेने सरकले आहेत.

आज उद्या तापमानात वाढ होईल आणि बुधवारनंतर राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. वाशिम नांदेड परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय.

tc
x