X

Weather Update:मान्सूनबाबत हवामान विभागाकडून अपडेट जारी – पहा कसा राहणार यावर्षी पाऊस

⏲️ मागच्या वर्षी हवामान खात्याने 96 टक्के पावसाचा इशारा दिला होता. तर यंदाही हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या वर्षीच्या पावसावर अल् निनो वादळाचा प्रभाव होण्याची शक्यता आहे.

🗣️ दरम्यान अल-निनो वादळे असूनही यंदा मान्सूनचा 90 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागांकडून वर्तविण्यात आली आहे.

💁‍♀️ पहा काय सांगितले हवामान खात्याने

⛈️ मागच्या तीन वर्षांत ला-निनो या वादळाचा प्रभाव होता. पण यंदा अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मात्र मे पर्यंत अल-निनोची स्थिती न्यूट्रल, जून, जुलैमध्ये साधारण, ऑगस्टमध्ये थोडा सक्रिय असेल.

💧 तर त्यानंतर तो अधिक प्रभावी व पावसाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. भारतात जून, जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल. तर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 50 टक्के कमी पाऊस होईल.

🖊️ तसेच नैऋत्य मान्सूनचा प्रभाव जुलैपर्यंत अधिक असल्याने बंगालची खाडी व अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांचा फायदा मिळतो. त्यामुळे यावर्षी 90 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान हवामान विभागाने दिली आहे.

😇 यावर्षीच्या मान्सूनबाबत असलेली हि बातमी – सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा

This post was last modified on April 6, 2023 9:35 am

Davandi: