X

Weather Alert : सावधान तो परत येतोय, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अन गारपीटीचा इशारा

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पुढचा आठवडादेखील राज्यासाठी महत्त्वाचा असणार आहे.

राज्यात वारंवार होणाऱ्या हवामान बदलामुळे आधीच शेतकरी हैराण झाला आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून देशाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान शास्त्रज्ञांनी क्लायमेट ट्रेंडला दिलेल्या माहितीनुसार, पुढील काळात मध्यपूर्व आणि दक्षिण भारतामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उत्तर मैदानी भागातही काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असेल. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांमध्ये उष्णतेच्या वाढत्या तणावामुळे यंदा मान्सूनपूर्व सरी या नियोजित वेळेआधीच सुरू झाल्यात. त्यामुळे संपूर्ण देशाला या हवामान बदलाचा सामना करावा लागणार आहे.

सामान्यतः मान्सूनपूर्व हवामान हे मार्चच्या उत्तरार्धात सुरू होतं. परंतु, फेब्रुवारीमध्येच तापमानामध्ये अधिक उष्णता वाढल्यामुळे यंदा लवकरच अवकाळी पावसाला सुरू झाली.

दरम्यान, आगामी काळामध्ये देशावर दोन चक्रीवादळांचं सावट असणार आहे. एक चक्रीवादळ पूर्व मध्य प्रदेशात पाहायला मिळेल तर दुसरं तेलंगणा आणि लगतच्या उत्तर आंध्र प्रदेशात पाहायला मिळेल. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये आद्रतेमुळे दोन्ही प्रणाली अधिक तीव्र झाल्या आहेत.

मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली. यावेळी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तसेच दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या औषधी हवामानामुळे पिकांवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशा सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्यात.

या महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पाऊस आणि गडगडाटामुळे राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळालं.

पावसामुळे नुस्कान होणारे कामे लवकरच करून घ्या

This post was last modified on March 13, 2023 10:53 am

Davandi: