Weather Alert: पुढील 6 तास महत्त्वाचे; चक्रीवादळाचे दिसणार अती रौद्ररुप

बिपरजॉय चक्रीवादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, Biporjoy आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. पुढील 6 तास महत्त्वाचे आहेत. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई कुलाबाच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या महितीनुसार अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले असून, त्या वादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे.

दरम्यान, या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून, वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिक, पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

tc
x