X

Wearing Tulsi Mala :तुळशी माळ गळा..!, कशी बनवतात तुळशीची माळ? माळेचे महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर

Importance Of Tulsi Mala : तुळशीची माळ आपण अनेक व्यक्तींच्या गळ्यात घातलेली असल्याचं पाहातो किंवा देवळात काही व्यक्ती तुळशीची जपमाळ घेऊन भगवान श्रीविष्णूचं नामस्मरण करत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं.
तुळशीचे अनन्य साधारण फायदे आहेत. तुळस ही आयुर्वेदिक किंवा औषधी गुणधर्म असणारं रोप आहे आणि म्हणूनच तुळस भगवान श्रीविष्णू यांना प्रिय आहे. तुळशीच्या रोपात माता लक्ष्मी निवास करतो असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं गेलं आहे.

तुळशीची माळ आपण अनेक व्यक्तींच्या गळ्यात घातलेली असल्याचं पाहातो किंवा देवळात काही व्यक्ती तुळशीची जपमाळ घेऊन भगवान श्रीविष्णूचं नामस्मरण करत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हणतात की तुळशीमाळेने भगवान विष्णू यांचं नाम घेतल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात.

आज आपण तुळशीमाळ गळ्यात घालायची असल्यास कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहजे हे पाहाणार आहोत.

गळ्यात तुळशीमाळ घालताना काय घ्यावी काळजी

तुळशीमाळेशी संबंधित नियम :-

धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार तुळस दोन प्रकारची असते, पहिली राम तुळस, दुसरी श्यामा तुळस. या दोन्हींचा परिणाम वेगळा आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुळशीची माळ घातली असेल तर तुम्हाला सात्विक अन्नच खावे लागेल. मांस, दारू इत्यादीपासून दूर राहावे लागते. तसेच, तुम्ही लसूण आणि कांदा खाऊ शकत नाही.

एकदा धारण केल्यावर गळ्यातून काढू नये तुळशीमाळ

ज्यांनी तुळशीची जपमाळ घातली आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे की एकदा जपमाळ घातली की चुकूनही काढू नका. तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी गंगेच्या पाण्याने शुद्ध करून वाळल्यानंतरच धारण करावी. जर तुम्ही ही माळ घातली असेल तर रुद्राक्ष धारण करणे तुमच्यासाठी योग्य नाही, असे मानले जाते की असे केल्याने फळ मिळत नाही.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही

This post was last modified on %s = human-readable time difference 9:28 am

Davandi: