Voter Helpline APP : विधानसभा निवडणुकीमध्ये संबंधित जिल्ह्यातील नागरीकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव असणे आवश्यक आहे. या निवडणूकीत वापरल्या जाणाऱ्या मतदार यादीत नाव येण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6 च्या अर्जाव्दारे नोंदणी करण्याचा शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 हा आहे.
वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरीकांनी ‘मतदाता सेवा पोर्टल’ https://voters.eci.gov.in/ आणि ‘वोटर हेल्पलाइन अँप’ (Voter Helpline APP) यावर ऑनलाइन सुविधाचा वापर करुन 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याकरीता नमुना क्र. ६ च्या अर्जाव्दारे नोंदणी करावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
मतदान यादीत तुमचे नाव कसे शोधाल?
मतदान यादीत आपले नाव तपासण्याची प्रक्रिया सोपी आहे. काही मिनिटांमध्ये ऑनलाइन प्रकियेद्वारे मतदान यादीत नाव शोधता येते. सर्वात पहिल्यांदा electoralsearch.eci.gov.in ला भेट द्यावी लागेल. या लिंकवर जाताच तुम्हाला एका पेजवर तुमचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, जन्मतारीख, वर्ष, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ यांच्या माहितीची नोंद करावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर ‘कॅप्चा’ कोड टाकावा लागेल आणि मग संबंधित यादी उघडेल. तसेच electoralsearch.eci.gov.in वर EPIC किंवा मतदार आयडी क्रमांकाद्वारे यादीतील तुमचे नाव तपासू शकता. EPIC क्रमांक आणि राज्य निवडून, तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्हाला कळेल. मतदार यादीतील नाव शोधण्याचे दोन्ही पर्याय तुम्ही electoralsearch.eci.gov.in ला भेट दिल्यानंतर दिसून येतील.
कृपया ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा..
हेही वाचा : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण
हेही वाचा : आता घरबसल्या काढा आपल्या शेतजमिनीचा नकाशा
हेही वाचा : शिधापत्रिकाधारकांना मिळणारी योजना बंद
This post was last modified on October 18, 2024 6:02 am