X

Viral Video : तरुणाचा लग्नातील तो डान्स शेवटचा ठरला लोक नाचत राहिले आणि तो मृत्यूची झुंजत…..

व्हिडीओतील तरुण उत्साहाने एका लोकप्रिय गाण्यावर नाचत असताना अचानक खाली पडला

आजकाल तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा प्रकारची समस्या सामान्यतः वयस्कर लोकांमध्ये आढळते, परंतु आता तरुण वयातील मुलंदेखील हृदयविकाराच्या झटक्याचे बळी ठरू लागले आहेत. तरुणांना जिममध्ये व्यायाम करताना तर कधी डान्स करताना हृदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक घटना आपण बघितल्या आहेत.

सध्या एक अशीच घटना तेलंगणामध्ये नातेवाईकाच्या लग्नात डान्स करणाऱ्या तरुणासोबत घडली आहे. ज्यामध्ये १९ वर्षीय तरुण लग्नात डान्स करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेचा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना शनिवारी रात्री हैदराबादपासून सुमारे २०० किलोमीचर अंतरावर असलेल्या निर्मल जिल्ह्यातील पारडी गावात घडली. आपल्या नातेवाईकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या मुत्यम नाचत असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. तरुण उत्साहाने पाहुण्यांसमोर एका लोकप्रिय गाण्यावर नाचत होता. नाचत असताना तो अचानक खाली पडला आणि बेशुद्ध झाला. पाहणाऱ्यांना वाटले की ही त्याच्या डान्सची काही स्टेप आहे. मात्र, तो बराच वेळ झाला तरी उठत नसल्याचं पाहून लोकांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला तातडीने जवळच्या भैन्सा एरिया हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं

तेलंगणातील दुसरी घटना –

डॉक्टरांनी सांगितले की तरुणाला मोठ्या तीव्रतेचा हृदयविकाराचा झटका आला असावा. धक्कादायक बाब म्हणजे तेलंगणातील चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. २२ फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील जिममध्ये व्यायाम करताना एका २४ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे व्यायाम करताना किंवा नाचताना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.

This post was last modified on %s = human-readable time difference 12:25 pm

Categories: आरोग्य
Davandi: