Viral Video: तलाठी भरती फी साठी जनतेचा आवाज उठताच! मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे उत्तर एकूण तुम्हाला धक्काच बसेल? पहा व्हिडिओ..

तलाठी, वन रक्षक सारख्या परीक्षेसाठी आकारले जाणारे शुल्क हजार रुपयांवर आणले गेले आहे. आपल्या ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण – तरुणींनी इतकी रक्कम आणायची कोठून? इथं शेतकरी वर्षभर रक्ताचे पाणी करूनही त्याच्या पदरी कुटुंबाचा गाडा चालेल इतकाही दमडा पडत नाही.

त्या शेतकऱ्यांच्या लेकरानी बापाकडे कोणत्या तोंडाने एखाद्या परीक्षेसाठी इतकी रक्कम मागायची? ५० हजारांची फिस क्लासला भरतात, असे तुम्ही म्हणता. त्याचे रिपोर्ट तुमच्याकडे आहेत म्हणता. तसे रिपोर्ट आमच्या ग्रामीण भागाचेही करा महोदय.

इथलेही वास्तव येवू द्या समोर. किती तरुण इतके पैसे भरून क्लास करीत आहेत, हेही महाराष्ट्राला कळू द्या.

पहा व्हिडिओ : – आज हिशोब सांगताय, उद्या तरुण हिशोब करतील….

शेतकऱ्यांचे सरकार म्हणवून घेताना नापिकी, दर शेतीमालाचे कवडीमोल दर यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्याकडे सोयीस्कर डोळेझाक करता. अगदी तसेच निव्वळ परीक्षा शुल्क नसल्याने स्पर्धेबाहेर फेकली जात असलेल्या शेतकऱ्यांच्या लेकराकडेही असे थातुर मातुर उत्तरं देऊन दुर्लक्ष करणे किती योग्य वाटते?

वर्षभरात अनेक परीक्षा होत असतात. वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या परीक्षेसाठीही वेगवेगळी फी असते. वर्षाला केवळ फी पोटी एका विद्यार्थ्याला जवळपास १५-२० हजाराचा भुर्दंड बसतो.

हे ही वाचा : Loan on LIC Policy  : LIC पॉलिसी धारकांसाठी आनंदाची बातमी! आता पॉलिसीवरही घेऊ शकता लोन ,जाणून घ्या!!

रोहित पवार यांनी सभेत मांडलेल विधान :

रोहित पवारांचं अतिशय अभ्यासु व मुद्देसूद विवेचन. राज्यातल्या तरुणांबद्दलची मनापासूनची कळकळ यातुन दिसतेय..

सर्वच विद्यार्थी खासगी क्लास लावतात असंही नाही, झोपडीत राहूनही गुणवत्ता यादीत येणारी अनेक उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांकडून असे पैसे वसूल करणं आणि आपण दिलेलं उत्तर मला तर पटलं नाही, युवांना पटलं की नाही ते पहावं लागेल.

म्हणून परीक्षा फी बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेताना अर्थमंत्री @AjitPawarSpeaks दादांनाही बोलवा तसंच मंत्रीपद दिलं नाही म्हणून एखाद्या आमदाराला दिडशे कोटी रु. निधी दिला असं समजून विद्यार्थी हिताचाच निर्णय घ्यावा, ही विनंती!

आज हिशोब सांगताय, उद्या तरुण हिशोब करतील….

tc
x