Video पाहून तुम्ही म्हणणार “क्या बात है”
विहिरीतून पाणी काढण्यासाठी बनवली विना विजेची भन्नाट मशीन एकदा पहाच
Viral Today: गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. आजवर आपण भारतात अनेक जुगाडू प्रयोग पाहिले आहेत.
त्यातीलच एक नवा प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्यात अनेक गावी पाणी आणण्यासाठी दूर जावे लागते. बरं एखाद्या विहिरीत पाणी दिसलं तरी पाणी उपसून बाहेर काढण्यासाठी वेगळी मेहनत असतेच.
बहुधा अशाच एका गावातील पठ्ठ्याने हा हटके शोध लावला असावा. या तरुणाने विहिरीतून पाणी काढण्यासाठी गाडीचे टायर्स, विटा, रबराच्या ट्यूब व काही टाकाऊ वस्तूंचा वापर करून एक कमाल सिस्टीम बनवली आहे. या विना वीज, विना पॉवर चालणाऱ्या मशीनचे काम पाहून नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत.
लहान मुलांच्या गार्डन मध्ये तुम्ही सी-सॉ प्रकार पहिला असेल. एकीकडे वजन जास्त झाले की दुसरी बाजू वर येते. आता हाच विज्ञानाचा नियम वापरून या पठ्ठ्याने विहिरीतून पाणी काढण्यासाठी डोक लावल आहे. एका बाजूला जड विटा ठेवून दुसरीकडे पाणी काढण्यासाठी छोटी बादली लावली आहे. मग या बादलीतील पाणी खेचण्यासाठी ट्यूब लावली आहे. हा जुगाड आता तुम्ही प्रत्यक्षच पाहाच
This post was last modified on %s = human-readable time difference 4:15 pm