X

Vastu tips : घरात मनी प्लांट लावत असाल तर ही घ्या काळजी नाही तर अन्यथा होतील

Vastu tips

Vastu tips : आपण घराच्या बागेमध्ये किंवा घरामध्ये अनेक प्रकारचे विविध झाडे आणि वेली लावत असतो व ही वनस्पती किंवा लहानसी रोपटे आपण कुंड्यांमध्ये लावतो.

✅अशाप्रकारे छोटी छोटी रोपे घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये लावल्यानंतर घराची शोभा वाढतेच.

घरात मनी प्लांट लावा, परंतु ही काळजी घ्या.

✅1)जर आपण वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घराच्या ईशान्य दिशेला कधीही मनी प्लांट लावू नये.

✅असे केले तर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकट येऊ शकते किंवा आर्थिक संकटात अडकू शकतात.

Vastu tips : 2)मनी प्लांट लावताना नेहमी आग्नेय दिशेला लावावा.

✅कारण आग्नेय दिशेला गणेशाची दिशा मानली जाते व या दिशेला मनी प्लांट लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते.

3)मनी प्लांटची लागवड केल्यानंतर तो ज्या पद्धतीने वरच्या दिशेने वाढतो त्याच पद्धतीने घरातील सदस्यांचे प्रगती होते असे वास्तुशास्त्र सांगते.

✅ त्यामुळे मनी प्लांटची वेल चुकूनही खाली जमिनीला स्पर्श होऊ देऊ नका.

✅यामागे असे मानले जाते की, जेव्हा त्याची वेल खाली येते तेव्हा घरातील पैशांचे नुकसान किंवा धनाची हानी होते.

4)तसेच वास्तुशास्त्रानुसार बघितले तर मनी प्लांटला कधीही वाळू देऊ नका.

✅समजा घरात लावलेल्या मनी प्लांटचे पाने वाळली किंवा पिवळी पडली तर लगेच घराबाहेर त्यांना फेकून द्यावेत.

5)असे देखील म्हटले जाते की मनी प्लांट कधीही घराच्या बाहेर लावू नये.

✅कारण मनी प्लांट जर घराच्या बाहेर लावले आणि बाहेरच्या लोकांची नजर जर त्यावर पडली तर मनी प्लांटची वाढ थांबते व यामुळे या स्थितीचा कुटुंबातील सदस्यांवर खूप वाईट परिणाम होतो.

हेही वाचा : रात्री कोणत्या बाजूने झोपावे*डाव्या की उजव्या?

हेही वाचा : अपयशाचा पराभव करण्यासाठी या 5 गोष्टी पडतील उपयोगी!
हेही वाचा : सोप्या भाषेत, लाडकी बहीण योजना

This post was last modified on %s = human-readable time difference 9:17 am

Davandi: