UPI AUTO PAY : UPI वापरताय? अनेक वेळा आपल्या बँक खात्यातून दर महिना आपोआप पैसे कट होऊन जातात का? यामागे कारण असू शकते UPI ऑटोपे. NPCI ने सुरू केलेल्या या सुविधेमुळे आपण वीज, पाणी, इंटरनेट या रिचार्जसारखी रोजची पेमेंट्स वेळेवर करता येतात. पण कधीकधी यामुळे गैरसोय होते आणि ही ऑटोपे बंद करायची गरज असते.
असा त्रास तुम्हालाही होत असेल आणि हे पेमेंट कट होणे थांबवायचे असेल तर चिंता करू नका. तुमच्या UPI अॅप मध्ये जा आणि खालील सोप्या पद्धतीने ऑटोपे बंद करू शकता.
UPI ऑटोपे काय आहे?
UPI ऑटोपे हे UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) मध्ये खास पेमेंट वैशिष्ट्य आहे. हे बिले आणि सदस्यतांचे स्वयंचलित डेबिट करते. वापरकर्ते बिल, विमा प्रीमियम आणि सदस्यता सेवांसाठी ऑटोपे सेट करू शकतात. Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या UPI ॲप्सद्वारे ऑटोपे तयार आणि व्यवस्थापित केले जाऊ शकतात. हे वैशिष्ट्य वेळेवर पेमेंट सुनिश्चित करू शकता. जेणेकरून दर महिन्याला तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज भासत नाही. सगळे पेमेंट ऑटोमॅटिक होऊन जातात.
UPI ऑटोपे बंद कसे कराल?
तुमचे UPI अॅप उघडा ( फोनपे, गुगलपे इत्यादी)
स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा
आता ‘पेमेंट मॅनेजमेंट’ यासारख्या पर्यायावर जा
तिथे तुम्हाला ‘ऑटोपे’ पर्याय दिसेल
यावर क्लिक केल्यावर सध्या कोणत्या सेवांना ऑटोपे चा access आहे ते दिसेल.ज्या सेवांसाठी तुम्ही ऑटोपे बंद करू इच्छिता त्यावर क्लिक करा.
आता ‘ऑटोपे थांबवा’ (pause) किंवा ‘ऑटोपे डिलीट करा’ (Delete AutoPay) या पर्यायांपैकी निवडा.
आता तुमच्या निवडीच्या सेवांसाठी UPI ऑटोपे बंद झाले असेल.ही प्रक्रिया थोडी थोडी वेगळी असू शकते पण सर्वसाधारणपणे सर्व UPI अॅप्स मध्ये सारखीच असते.
कृपया ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा..
हेही वाचा : सीआरपीएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 11,000+ पदांसाठी भरती, दहावी पाससाठीही संधी!
हेही वाचा : रोज च्युइंगम चघळणे: फायदे की तोटे? तज्ज्ञांनी केला खुलासा!
हेही वाचा : नोकरीच्या नवीन संधी कशा मिळतात