Turkey Earthquake : भूकंपग्रस्त टर्कीत १० भारतीय नागरिक अडकले, एक बेपत्ता

टर्की आणि सीरिया एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. या घटनेत आत्तापर्यंत १५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून २० हजारांपेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त जणांचा ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, भूकंपामुळे १० भारतीय नागरिकही टर्कीत अडकले असून एक भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा म्हणाले, भूकंपामुळे १० भारतीय नागरिक टर्कीमध्ये अडकले आहेत. ते सध्या सुरक्षित असून त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच एक भारतीय नागरिक दोन दिवसांपासून बेपत्ता असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत. तसेच आम्ही संबंधित व्यक्तीच्या कुटुबियांच्या संपर्कात आहोत. याबरोबच टर्कीतील भारतीयांसाठी अंकारा येथे विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे असल्याची माहितीही त्यांनी दिली. मंत्रालयाने दिली आहे

दरम्यान, भारताने आतापर्यंत चार सी-१७ विमाने टर्कीमध्ये पाठवली असून यापैकी दोन विमानात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तर इतर दोन विमानात वैद्यकीय पथकं पाठवण्यात आली आहेत. तसेच एक सी-१३० विमान वैद्यकीय पथकासह सीरियालाही रवाना करण्यात आले असल्याची महिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे ( एनडीआरएफ) महासंचालक अतुल करवाल यांनी दिली

tc
x