WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार; तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज.

▪️ १० ते १२ जूनपर्यंत मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी सुनील कांबळे यांनी दिली आहे. तसेच राज्यात पावसाळा ९६% पर्यंत सामान्य राहणार असून राज्यात सरासरी 87 मिमी पाऊस पडेल असंही ते म्हणाले.

▪️ मोठी बातमी ! 15 ऑगस्टपूर्वी राज्यात 75 हजार पदांची मेघाभरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर २०२२-२३ ची संचमान्यता अंतिम झाल्यावर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांसह-

▪️ खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची ३० ते ३२ हजार पदे ऑगस्ट २०२३ पूर्वी भरली जातील. पुढच्या वर्षी उर्वरित ५० टक्के पदभरती होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
💁‍♂️ विषय – मन

📲 https://vishwakavitanche.com/2023/05/10/मन/

▪️ जगभरातील सिनेप्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदा हा फेस्टिव्हल फ्रान्समध्ये 16 मे ते 27 मे दरम्यान होणार आहे.

▪️ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पुन्हा ईडीची नोटीस सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे एडीकडून आदेश देण्यात आले

▪️ इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिल आहे इन्फोसिसने सध्याच्या बाजारभावानुसार 64 कोटी रुपयांच्या शेअर्सचे कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले, तब्बल 5,11,862 इक्विटी शेअर्सचे कंपनीने वाटप केले

💁‍♂️ महिलांनो 7/12ऱ्यावर नाव आहे? तर असा घ्या योजनेचा लाभ‼️
👇येथे वाचा👇 https://davandi.in/2023/02/09/lakshmi-scheme-महिलांनो-सातबाऱ्यावर-न/


▪️ जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्वी जिल्हा परिषद पातळीवर करण्यात येत होती. मात्र राज्य सरकारने तो निर्णय बदलून राज्यस्तरीय भरतीचा निर्णय घेतला होता.

▪️ मात्र आता पूर्वीप्रमाणेच जिल्हा परिषद पातळीवरच कर्मचारी भरती होणार आहे. सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकूण 18 हजार 939 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

▪️ ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहून गुगलने सुद्धा अशीच सेवा देणारे Google Brad हे टूल सुरु केले असून नुकतेच भारतासह 180 देशांत ते लॉन्च करण्यात आले.

💁‍♂️ मुलींना मिळणार 1 लाख 43 हजार रुपये मोफत केंद्र सरकारची खास योजना‼️
https://davandi.in/2023/02/06/girls-will-get-rs-1-lakh-43-thousand-free/

▪️ मुख्य म्हणजे केवळ इंग्रजीच नाही तर अजून 40 भाषांचा सपोर्ट गुगल उपलब्ध करून देणार असल्याने येणाऱ्या काळात Google Brad हे ChatGPT ला मोठे आव्हान देईल असेच दिसते आहे.

● मरताना पक्षाच्या पंखाची फडफड होते तशीच चंद्रकांत खैरे यांची अवस्था, केंद्रीय मंत्री भागवत कराडांची खोचक टीका.

● मागील तीन महिन्यांत महाराष्ट्रातून तीन हजारांहून अधिक मुली बेपत्ता; महिला आयोगाने राज्य सरकारला विचारला जाब.

● कालीचरण महाराज यांच्यावर समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; संभाजी नगरच्या पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन केला गुन्हा दाखल.

● महाविकास आघाडीचा पोपट मेला असून फक्त कार्यकर्त्यांसाठी नेते वक्तव्ये करत आहे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला.

● पुढच्या सहा महिन्यात PVR Inox चे 50 थिएटर बंद होणार; 333 कोटींचा तोटा झाल्यानंतर कंपनीचा निर्णय.

● IPL 2023 : गतविजेत्याची यशस्वी घौडदोड, गुजरातचा हैदराबाद वर मोठा विजय; यंदा क्वालिफाय होणारा गुजरात पहिला संघ तर हैदराबादच या स्पर्धेतील आव्हान संपुष्ट.

tc
x