▪️ मे महिन्यातही काही भागांमध्ये ढगाळ वातावरण अनुभवायला मिळतंय. अशातच बंगालच्या उपसागरात ९ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.
▪️ WTC Final आधी मोठी अपडेट, या 3 खेळाडूंचं पालटलं नशीब निवड समितीने ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सूर्यकुमार यादव या तिघांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड केली असून त्यांना इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
▪️ मिशन कावेरी पूर्ण, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मणिपूरमधील दंगलीत अडकलेले महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता विशेष विमानाने मुंबईत परतले.
▪️ रिंकू सिंह हा पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स टीमसाठी मॅचविनर ठरला आहे. केकेआरला शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. रिंकूने या शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत केकेआरला विजय मिळवून दिला.
▪️ मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झालंय. वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.
▪️ एकीकडे ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून वातावरण तापले असताना, राज्यातून गेल्या तीन महिन्यांत ५ हजार ६१० तरुणी बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मार्चमध्ये सर्वाधिक २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसाला सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहे.
◆ईडीची मोठी कारवाई.पनामा पेपर्स प्रकरणात ईडीने झवरेह पूनावाला ह्यांची 41कोटींची मालमत्ता जप्त केली.
◆अवकाळीने पुणेकरांना केले त्रस्त.पुण्यात मुसळधार पावसाने केली वाहतूक कोंडी.
◆ठाकरे पवार सरकारच्या काळात मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्या. मुनगंटीवार ह्यांचा आरोप.सध्या मंत्रालयात कुणीही बसत नाही ह्या अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले.
◆द केरला स्टोरी पश्चिम बंगाल मध्ये बॅन. द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी हे पाऊल उचललं आहे, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. निर्माते कोर्टात जाणार.
◆महारेरा आता सुरुवातीपासून नजर ठेवणार. विकासकांवर वचक ठेवण्यासाठी आणि रखडलेले व सतत मुदतवाढ घेणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढू नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं.