TOP NEWS UPDATE: सकाळच्या TOP महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट: 26 मे 2023

● यंदा बारावीच्या निकालाचा टक्का घसरला, राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के इतका; यंदाही निकालात मुलींची बाजी तर 17 महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के.

● राज्य सरकारचा मोठा निर्णय! झोपडपट्टी वासियांना मिळणार अडीच लाखात घर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

▪️ भारत लवकरच 900 कोटींचा वेगवान कम्प्यूटर तयार करणार, ‘मिहिर’ या सुपर कम्प्यूटरपेक्षा नवा कम्प्यूटर 3 पटीने अधिक शक्तीशाली असणार, अशी माहीती केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्री किरण रिजीजू यांनी दिली.

▪️ मोठी बातमी ! मान्सून वेळेत दाखल होणार, अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती स्कायमेटच्या अध्यक्षांनी दिली आहे.

▪️ संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 1197 कोटी जिल्ह्यांना वितरित होणार अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी केली.

▪️ मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना केवळ अडीच लाखांमध्ये घर देण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

▪️ युक्रेनसोबतच्या युद्धामुळे जगापासून एकाकी पडलेला रशियाने भारताला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्समध्ये तेल आणि शस्त्रास्त्र करार करण्याची धमकी दिली आहे

▪️ क्रिकेटर विराट कोहलीने इंस्टाग्रामवर 250 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला आशियाई सेलिब्रिटी आणि रोनाल्डो व मेस्सी नंतरचा तिसरा एथलिट बनला आहे.

● सरकारी काम आणि सहा महिने थांब हे चित्र बदलणार, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरीत उद्घाटन

● राज्यसभेत अध्यादेशाविरोधात विरोधकांनी मतदान करावं; पवारांच्या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांचं जनतेला आवाहन.

● नौदलाची ऐतिहासिक कामगिरी : आएनएस विक्रांतवर रात्रीच्या वेळी लढाऊ विमानाचं यशस्वी लँडिंग.

● वाद काही मिटेना: नव्या संसद भवनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यास विरोध; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल.

● मान्सून संदर्भात महत्वाचं अपडेट; पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण, भारतीय हवामान विभागाची माहिती.

● समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आज होणार खुला, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; नागपूर ते नाशिकचा पल्ला सहा तासांत होणार पार.

● IPL 2023 : फायनलचं तिकिट कोणाला मिळणार? आज गुजरात आणि मुंबई यांच्यात दुसऱ्या क्वालिफायर सामन्याचा थरार रंगणार.

tc
x