▪️ “प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत भाजपाला…”, उद्धव ठाकरेंचं विधान, आज पंतप्रधान मतदारांना ‘बजरंग बली की जय’ म्हणा सांगतात. मग तुमचे बळ आणि ५६ इंचाची छाती कुठे आहे? त्यामुळे यापुढील प्रत्येक निवडणुकीत ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हणत भाजपाला तडीपार करा,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं आहे.
▪️ हुकूमशाही पद्धतीने प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू! उद्धव ठाकरे यांचा इशारा
प्रस्तावित बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या अनुषंगाने या परिसरातील कातळशिल्पांची पाहणी केल्यानंतर ठाकरे यांनी धोपेश्वर-गिरमादेवी कोंड येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.
▪️अजित पवार यांच्याविषयी जाणीवपूर्वक संभ्रम; शरद पवार यांचे वक्तव्य; बारामतीमध्ये जल्लोषात स्वागत
अजित पवार हा काम करणारा माणूस आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी बारामतीमध्ये केली.
▪️ पवारांच्या राजीनाम्यासाठी अनेक जण आतुर* ; जयंत पाटलांच्या वक्तव्याने चर्चा
पाटील यांचे हे मतप्रदर्शन विरोधकांसाठी होते की स्वपक्षातील नेत्यांविषयी यावरून दिवसभर चर्चा सुरू होती
▪️मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवादी पाकिस्तानात ठार.
परमजितला अमली पदार्थ, शस्त्रास्त्र तस्करी आणि दहशतवादी कारवायांमुळे 2020 साली भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलेलं.
▪️लोकवर्गणीतून उभे राहणारे देहूमधील जगतगुरू संत तुकोबारायांचे मंदिर अयोध्येतल्या मंदिराप्रमाणेच.
दोन्ही मंदिरांच्या बांधणीसाठी एकाच खाणीतील दगड वापरण्यात येत आहेत. 2025 पर्यन्त मंदिर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न.
▪️कोकणवासीयांना आपले हक्क समजले पाहिजेत.
बारसूतील स्थानिक लोकांची जी भूमिका तीच आमची भावना. राज ठाकरेंनी बारसू रिफायनरी प्रकरणी रत्नागिरीत घेतलेल्या सभेत सरकारवर टीकास्त्र सोडले.
▪️मल्लिकार्जुन खर्गे ह्यांच्यावर 100कोटी रुपये नुकसानभरपाईचा दावा.
बजरंगदलाची बदनामी केल्याप्रकरणी विहिंपने काँग्रेस अध्यक्ष खर्गेंवर नुकसानभरपाईची नोटीस पाठवली आहे.
▪️IPL-फिल्प सॉल्ट चे वादळ.
फिल्प सॉल्टच्या जोरदार खेळीने दिल्ली कॅपिटल्स ने RCB वर 17व्या षटकात 7 गडी राखून विजय मिळवला.
This post was last modified on %s = human-readable time difference 3:03 am