WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

■ मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन भागिदारी याबद्दल माहिती दिली

■ बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

■ जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्कराचे वाहन दरीत कोसळून 2 जवान शहीद

■ राहुल गांधींना दिलासा मिळणार? गुजरात हायकोर्ट २ मे रोजी सुनावणार फैसला

■ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

■ मोठी घटना! भिवंडीत वलपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळली; 40 ते 50 जण अडकल्याची भीती

■ अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 8 मे पर्यंत वाढ

■ यंदा 1 आणि 2 जून 2023 रोजी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा; विविध कार्यक्रमांचे आयोजन

हे ही वाचा :💁‍♂️ महाराष्ट्र दिनानिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा. स्पर्धा ‼️
👇येथे पहा 👇
https://davandi.in/2023/04/29/maharashtra-day-महाराष्ट्र-दिन-प्रश्नम/

▪️ चीनच्या सीमेलगत असणारे उत्तराखंड मधील ‘माणा’ हे गाव भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जायचे. पण गेल्या वर्षी नरेंद्र मोदींनी येथे दौरा केला होता आणि त्यात त्यांनी उत्तराखंडचे माणा हे भारताचे शेवटचे नाही तर पहिलेच गाव म्हणून ओळखले जाणार अशी घोषणा केली आहे.

▪️ अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्वीट करून दिली.

▪️ राम मंदिराचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, गर्भगृहाचे खांब १४ फुटापर्यंत तयार झाले आहेत, मंदिराचे बांधकाम तीन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होईल. दुसरा टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये तर २०२५ पर्यंत मंदिर पूर्णपणे तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.

▪️ संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलने सर्व 18 जागा जिंकल्या यामध्ये त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला आहे.

▪️ BYJU’S चे सीईओ रवींद्रन बायजू यांच्या अडचणी वाढतच चाल्या आहेत. रवींद्रन बायजू यांच्या बेंगलोर येथील ऑफ‍िस आणि रेसिडेंश‍िअल परिसरात ईडीने छापेमारी केली असून तेथून काही ‘आक्षेपार्ह’ दस्तऐवज आणि डिजिटल डाटा जप्त करण्यात आला आहे.

▪️ तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारच्या मदतीने तुम्ही मोठा सेटअप उभारू शकता. यासाठी केंद्र सरकार तुम्हाला ५० लाखांपर्यंतचे कर्ज देत ​​आहे. दरम्यान यासाठी अर्ज कुठं करायचा हे आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ

● राज्यात अवकाळी पावसाचं थैमान ; राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं मोठ नुकसान केलं आहे. यात जीवितहानीसह शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

● बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी; आज राहिलेल्या बाजार समित्यांचा निकाल जाहीर होणार.

● भिवंडी इमारत दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, तर नऊ जण जखमी; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा.

● सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची कृषीमंत्री सत्तारांकडून पाहणी; नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश.

● कर्नाटकात भाजपला धक्का बसणार, काँग्रेस बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता; एबीपी-सी वोटरच्या महाओपिनिअन पोलचा अंदाज.

● पाऊस-पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन 1 जून नंतरच पेरणीचे नियोजन करा; शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन.

● ऑपरेशन ‘कावेरी’ : सुदानमध्ये अडकलेले 2100 भारतीय सुखरुप परतले! भारत सरकारचं ऑपरेशन कावेरी जोमानं सुरू

● IPL 2023 DC vs SRH : हैदराबादने पराभवाचा वचपा काढला; दिल्लीला 9 धावांनी केला पराभव, मेचेल मार्शची अफलातून खेळी व्यर्थ.

tc
x