X

Top News:आजच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट घडामोडींवर एक नजर (2 मे 2023)

आयुष्यात खूप वादळ येतील पण आपण हार मानायची नाही….!

■एप्रिल 2023 मध्ये जीएसटी कलेक्शनने मोडले सर्व विक्रम; 1.87 लाख कोटी रुपयांचा महसूल संकलित

■केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी आणि पाऊस सुरूच, प्रवाशांच्या अडचणी वाढल्या

■मोफत गॅस सिलिंडर आणि प्रतिदिन अर्धा लिटर नंदिनी दूध, कर्नाटकात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

▪️ सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटासंदर्भात ऐतिहासिक निर्णय दिला आहे. यापूर्वी घटस्फोट घेण्यासाठी सहा महिने थांबावे लागत होते – मात्र आता जर नातेसंबंधांमध्ये सुधारणा होत नसेल, तर थांबण्याची काही गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

▪️ खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेने डेबिट कार्ड सुविधेसाठी वार्षिक शुल्कात वाढ केली आहे. २२ मेपासून हे नवे दर लागू होणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

▪️ घोटाळा करूनच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले मात्र आता त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे – वज्रमूठ सभेतून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

▪️ मुंबईकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे – कारण शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला कोस्टल रोड लवकरच पूर्णत्वास येणार आहे. कोस्टल रोड या वर्षाअखेरीस सुरु होणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

▪️ केंद्र सरकारने काल पुन्हा एकदा 14 अँप बंद केले आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गटांकडून वापरण्यात येणारे १४ मेसेंजर मोबाइल अॅप्लिकेशन्स ब्लॉक केले आहेत.

▪️ यामध्ये Cripwiser, Enigma, SafeSwiss, Vikrame, Mediafire, Briar, Beechat, Nandbox, Conion, IMO, Element, Second Line, Jangi, Threema अशा अँपचा समावेश असल्याची माहिती आहे.

■उत्तर प्रदेशातील दक्षिण खेरी वनविभागात वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला; गेल्या 3 आठवड्यातील सहावी घटना

■२०२४ मध्ये महाराष्ट्रात आणि देशात हीच वज्रमूठ सत्तेत येईल – संजय राऊत

■सध्याची कोरोना लाट 15 मेपर्यंत संपणार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा दावा

■एमपीएससीचा पेपर अवघड गेल्याने बीडमध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

■’बारमध्ये रात्री 3 वाजता भाजप नेत्याने घातली पोलिसांशी हुज्जत’, राऊतांचा खळबळजनक दावा, थेट फडणवीस यांना लिहिलं पत्र

▪️ नाशिकमध्ये कोयता खरेदीसाठी आधार कार्ड दाखवावं लागणार; कोयता गँगला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून नवा आदेश जारी.

▪️ महाराष्ट्रापासून मुंबई तोडणाऱ्यांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, मग तो कोणीही असो – उध्दव ठाकरे यांचा इशारा

▪️ मी 6 तारखेला बारसूला जाणार, तिथे बोलणार; वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं आव्हान स्वीकारलं.

▪️ बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ होतंय तयार; हे चक्रीवादळ 11 ते 15 मे दरम्यान बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता.

▪️ जीवनशैली बदलाचे परिणाम माकडांवरही, माकडांच्या आहारामध्ये चिप्स फास्टफूड आल्यामुळे अनेक वानरांना कर्करोग झाल्याचं निष्पन्न; संभाजीनगरच्या डॉक्टरचा धक्कादायक दावा.

▪️ वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट, सध्याची कोरोना लाट 15 मेपर्यंत संपणार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा दावा.

▪️ GST संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडले: एप्रिलमध्ये 1.87 लाख कोटींचा विक्रमी जीएसटी जमा, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून आकडेवारी जारी.

▪️ IPL 2023 LSG vs RCB : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात पुन्हा बाचाबाची, वादामुळेच गाजलेल्या या सामन्यात RCB ने मारलं मैदान, लखनौचा केला 14 धावांनी पराभव.

This post was last modified on %s = human-readable time difference 3:17 am

Davandi: