● घर खरेदी-विक्री नोंदणीचे दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी-रविवारी देखील सुरू राहणार; राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची माहिती.
● संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेगिरी करू नये – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा : महविकास आघाडीत बिघाडी होत असल्याच्या चर्चांना उधाण.
● जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा; पवारसाहेबांनी निर्णय मागे घ्यावा, आव्हाडांची मागणी.
▪️ पुढील दोन दिवस नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
▪️ नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांना बुद्ध पौर्णिमेनिमीत्त पाच फूट उंचीच्या शंभर बुद्ध मूर्ती प्रदान करण्यात आल्या आहेत. बुद्ध पौर्णिमेनिमीत्त पाच फूट उंचीच्या फायबर मेटलपासून बनविलेल्या शंभर बुद्ध मूर्तीची, शंभर भव्य रथांतून मिरवणूक काढण्यात आली.
▪️ या शंभर बुद्ध मूर्ती नाशिक जिल्ह्यातील शंभर गावांना दान करण्यात आल्या. नाशिकमध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्याकडून हा बुद्ध मूर्ती प्रदान सोहळा पार पाडण्यात आला.
▪️ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला. आयसीसी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकून भारतीय संघाने पहिला क्रमांक पटकावला आहे. १२१ गुणांसह टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे, तर ११६ गुणांसह ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
▪️ मुंबईत तयार होणार पहिला अंडरवॉटर टनल – मुंबईचा पाण्याखालील बोगद्यामुळे वेळेची बचत देखील होणार आहे. यामुळे गिरगाव ते वरळी हा 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
● जंतर-मंतरवर ‘मिड नाईट ड्रामा’; पोलिसांकडून जीवघेणा हल्ला झाल्याचे कुस्तीपटूंचे आरोप; तर “किरकोळ वाद झाला असून परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती.
● भारतीय वंशाचे अजय बंगा होणार जागतिक बँकेचे अध्यक्ष; 2 जून रोजी कार्यभार स्वीकारणार.
● निवडणुकीच्या प्रचारात रशियन मुली नाचवायच्या आहेत, दारु वाटायची आहे, परवानगी द्या; कानपूरमधील उमेदवाराचे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र.
● बंगालच्या उपसागरावर ‘मोचा’ चक्रीवादळाचं संकट; ओडिशा आणि बंगालचं होऊ शकतं मोठं नुकसान, हाय अलर्ट जारी.
● “माझी शेवटची IPL हे तुम्ही ठरवलं, मी नाही”; 2024 मध्येही खेळण्याचे धोनीचे स्पष्ट संकेत.