● दिलासादायक! उद्यापासून राज्यात पावसाचा अंदाज, 24 जूनपासून जोर वाढणार; भारतीय हवामान खात्याचा अंदाज.
▪️ आषाढीनिमित्त 76 विशेष रेल्वेगाड्या; मध्य रेल्वेची 23 जून ते 3 जुलैदरम्यान सेवा
▪️ दहावी, बारावीत विद्यार्थी नापास झाल्यास पगारवाढ बंद; आश्रमशाळा शिक्षकांना आदिवासी विकासमंत्र्यांचा इशारा
▪️ ‘जसवंत सिंग खलरा’ बायोपिक कायद्याच्या कचाट्यात! निर्मात्यांची उच्च न्यायालयात धाव
▪️ खासगी विद्यापीठांतील 10 टक्के आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना 50 टक्के शुल्क माफ
▪️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 4 जुलैला तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर
▪️नवी मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! शहरातील पहिली मेट्रो चालवण्याचा मार्ग मोकळा
▪️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सातारा दौऱ्यावर; तीन दिवस राहणार मूळगावी
▪️ जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंसह ४५ जणांविरोधात तक्रार
● मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार पेटला; गेल्या दीड महिन्यात हिंसाचारामुळे सुमारे 100 हून अधिक जणांचा मृत्यू.
● विरोधी पक्षनेते पदामध्ये इंटरेस्ट नव्हता, मला संघटनेत कोणतंही पद द्या, त्या पदाला न्याय देईल – अजित पवार.
● अमेरिकेनं विमानतळावर पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर, बायडेन दाम्पत्याकडून पंतप्रधानांचं व्हाईट हाऊसमध्ये स्वागत.
● “मी मोदींचा फॅन”, अस म्हणत एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट.
● आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, बीएमसी उपायुक्त बिरादार यांच्या घरी ईडीची छापेमारी; 12 तासानंतरही झाडाझडती सुरूच.
● नुस्ती दाढी कुरवाळता, काम केलं मी कौतुक करेल; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेना टोला.
● विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख नेते पाटण्यात जाणार; शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार.
● पाऊस लांबला! नाशिकमध्ये भाजीपाला कडाडला, कोथिंबीर शंभर रुपयाला जुडी तर इतर पालेभाज्यांच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ.
● SAFF Championship 2023 : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, 4-0 अशा फरकाने उडवला धुव्वा. सुनील छेत्री ठरला शिल्पकार.