● पुढील पाच दिवस मुंबईसह तळकोकणात मध्यम पावसाची शक्यता, तर 23 ते 29 जूनदरम्यान देशात चांगला पाऊस पडणार; हवामान खात्याची माहिती.
● महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत, गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट.
▪️ मुंबईकरांसाठी मोठी बातमी ती म्हणजे ‘रेशन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत आता रेशनधारकांना घरपोच रेशन मिळणार, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
▪️ भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प आहे असे मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधन केले आहे.
▪️ प्रेक्षकांनी संवादावर आक्षेप घेतल्यानंतर आदिपुरुष चे संवाद बदलणार असा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे.
▪️ रामायणचा मूळ आत्मा आणि स्वरूप बदलण्याची गरज नव्हती, अरुण गोविल यांनी व्यक्त केली आदिपुरूष बद्दलची खंत.
● महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत होती असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे.
▪️ मोठी बातमी ! मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 60,110 रुपये प्रति तोळा, तर चांदी 73,500 रुपये प्रति किलो झाली आहे.
● मराठवाड्यात पाच महिन्यात 391 शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ 10 कुटुंबांना; मार्चपासून निधीच नाही.
● ‘भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प’, मन की बात मधून पंतप्रधानांचे देशाला संबोधन.
● मोदी-शाहांशी आमचं वैयक्तिक भांडण नाही, आमचं भांडण महाराष्ट्रद्रोह्याशी; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल.
● शिवसेनेचा आज 57 वा वर्धापनदिन; शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी, तर सामनातून शिंदेंवर हल्लाबोल.
● बिहारमध्ये उष्णतेची तीव्र लाट; उष्णतेमुळे 24 तासात 35 जणांचा मृत्यू, तर 200 जण रूग्णालयात दाखल.
● MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या अहमदनगरच्या दर्शनाचा संशयस्पद मृत्यू; राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह.
● साथरोगामुळं जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत, मृदेसह पिकांचं आरोग्य वाढवणं गरजेचं; G-20 कृषीमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे आवाहन.
● सात्विक-चिराग जोडीनं इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी
This post was last modified on June 19, 2023 3:28 am