X

Tirth darshan yojna : ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू, कोणाला मिळणार लाभ? वाचा नियम आणि अटी…

Tirth darshan yojna

tirth darshan yojna : राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

tirth darshan yojna :या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रात पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे, तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये इतकी राहणार आहे .यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. ७५ वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल.

हेही वाचा : >>अलर्ट! २५ जुलैपर्यंत के वाय सी पूर्ण न केल्यास गॅस कनेक्शन कापले जाण्याची शक्यता!

Tirth darshan yojna :योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता…

१) लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
२) वय वर्षे ६० व त्यावरील ज्येष्ठ नागरिक.
३) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे…

१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
२) लाभार्थ्याचे आधार कार्ड/रेशनकार्ड
३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
(लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.)
४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे/ केशरी रेशनकार्ड.
५) वैद्यकीय प्रमाणपत्र.
६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
७) जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

लाभार्थ्यांची निवड… >>>येथे क्लिक करा <<<

This post was last modified on %s = human-readable time difference 10:00 am

Davandi: