💁🏻♂️ साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया सण साजरा केला जातो. यावर्षीचा शुभ मुहूर्त नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.
💫 अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त :
● पूजेचा शुभ मुहूर्त 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 पासून दुपारी 12.20 पर्यंत असणार आहे.
● तृतीया तिथी प्रारंभ – 22 एप्रिल सकाळी 07:49 पासून
● तृतीया समाप्ती – 23 एप्रिल सकाळी 07:47 पर्यंत
🤔 अक्षय्य तृतीयेचं महत्त्व काय? हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, घर, दागिने, कपडे, वाहने इत्यादी खरेदी करण्यासाठी हा शुभ दिवस मानला जातो.
🛕 अक्षय्य तृतीयेचं पौराणिक महत्त्व : अक्षय्य तृतीयेला पौराणिक महत्त्वही आहे. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं. भगवान विष्णूचा नर नारायण अवतार, हयग्रीव, परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला असल्याचं म्हटलं जातं.
हे ही वाचा🛕 साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण अक्षयतृतीया. 🔰मुळात साडेतीन मुहूर्त म्हणजे नक्की काय❓ समजून घेऊयात.
👇 येथे सर्वांनी नक्की वाचा 👇
https://davandi.in/2023/04/21/साडेतीन-मुहूर्त-म्हणजे-क/