X

विषय तिथेच संपला लग्नाला …….

लग्नाला 31 वर्षे पुर्ण होणार म्हणुन,
पोरांनी पुन्हा लग्न करण्याचा घाट घातला..

त्यासाठी हॉल बुक करुन सगळं साग्रसंगीत करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याचे योजीले

मी या गोष्टीला कडाडून विरोध केला नि म्हणालो,”लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा तेच पैसे, माझ्या व हिच्या जॉईन्ट अकाउंटला टाका व वारस म्हणुन नातवाच नाव टाका!”

पण पोरं हट्टालाच पेटली होती,
ऐकायच्या मनस्थितीत नव्हती.
माझी कुचंबणा होत होती, ही मात्र शांत होती.

अचानक सौ. म्हणाली, “31 वर्षांनंतर पुन्हा लग्न लावायचा घाट घालतच असाल तर माझी तयारी आहे, पण मी या माणसाशी पुन्हा लग्न करणार नाही!”

घरात पीनड्रॉप शांतता पसरली,
माझा चेहरा बघण्यालायक झालेला, सर्वांच्याच लक्षात आले..

विषय तिथंच संपला…

एकांतात वेळ मिळाल्यावर मी हिला विचारले,
“खरंच तु नाही करणार माझ्याशी परत लग्न?”

ही म्हणाली: सात जन्म तुमच्यासारखा पती मिळु दे,
म्हणुन मी नवस केलेला,

पण अनाठायी होणाऱ्या खर्चामुळे,
तुमची होत असलेली कुचंबणा माझ्या लक्षात आली,
आणी विषय मुळापासुन बंद करण्यासाठी ‘मी तसं बोलले’.”

मी सुखावुन म्हणालो,
“म्हणजे अजुन 6 जन्म तु मला साथ देणार तर..”

सौ.: नाही…. हाच सातवा जन्म आहे…
.
.

मोठा मिश्किल स्वभाव आहे हिचा …

🤭😂🤭😄😄😂😂

This post was last modified on February 3, 2023 10:28 am

Davandi: