छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती बाबत शिंदे सरकार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनेते यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील एका वक्तव्याने चांगलेच राजकारण तापले होते.
अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर आता सत्ताधारी शिंदे सराकरने छत्रपती संभाजी महाराज यांची शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यात आता छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. 14 मे रोजी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे.
दरवर्षी 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरीहोणार!
▪️आता दरवर्षी 14 मे रोजी सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे.
▪️हा निर्णय अत्यंत ऐतिहासिक असून शिवप्रेमींनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.