Teacher Transfers : शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! बदल्यांवरील बंदी उठवली, शासनाने काढलं परिपत्रक!

Teacher Transfers : राज्यात एखाद्या शैक्षणिक संस्थेची काही अनुदानित आणि काही विनाअनुदानित महाविद्यालये असतील, तर विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये काम करणार्‍या शिक्षकांना त्याच संस्थेच्या अनुदानित महाविद्यालयात काम करण्याची संधी मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला निर्देश दिल्यानंतर राज्य शासनाने शासन निर्णय काढत शिक्षकांच्या अनुदानित विभागात बदल्यांवरील स्थगिती उठवली असल्याचे स्पष्ट केले आहे.

Teacher Transfers : महाराष्ट्र शासनाने दि. 8 जून 2020 रोजी अधिसूचना काढून महाराष्ट्र खासगी शाळा सेवा शर्ती विनियमन अधिनियम 1977 मधील नियम 41 अ मध्ये सुधारणा करून विनाअनुदानित विभागात काम करणार्‍या शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या त्याच व्यवस्थापनाच्या अनुदानित विभागात बदल्या करण्याची तरतूद केली होती.

Teacher Transfers : या बदल्या करण्याबाबत दि. 1 एप्रिल 2021 रोजी शासननिर्णय काढण्यात आलेला होता. त्यानुसार 1 डिसेंबर 2022 पर्यंत बदल्या करण्यात येत होत्या. परंतु, अशा प्रकारच्या बदल्यांना मान्यता देताना शिक्षणाधिकारी कार्यालयात अनियमितता होत असल्याने आणि यासंदर्भात शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे कारण सांगून शासनाने संबंधित बदल्या स्थगित केल्या होत्या.
>>येथे क्लिक करा <<<

tc
x