विषय- शासनाच्या घोषणेनुरूप राज्यातील सर्व सेमी इंग्रजी शाळांना पाच हजार शिक्षकांची उपलब्धता करण्याबाबत आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून कोणतीच कार्यवाही न होणेबाबत.
महोदय ,
संदर्भीय विषयास अनुसरून , राज्यात शिक्षक भरती 2022-23 ची कार्यवाही सद्यस्थितीत सुरू आहे. सदर प्रक्रियेत सामाजिक समांतर आरक्षण बिंदू , स्तर व विषय तसेच माध्यम निहाय शिक्षकांची मागणी *व्यवस्थापनांकडून पवित्र पोर्टल वर नोंदविण्यात आलेली आहे.
वरील सर्व बाबींना विचारात घेऊन निवड प्रक्रिया राबवणारी यंत्रणा मागणीला अनुसरून उचित पात्रतेचे शिक्षक उपलब्ध करून देण्याचे काम पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येते.*
*चालू शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे पाच हजार शिक्षक सेमी इंग्रजी शाळांना उपलब्ध करून देणार याबाबत सन्माननीय शिक्षण मंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा करून विद्यार्थी व त्यांचे पालक यांना अस्वस्थ केले. तसेच विभागामार्फत या शासकीय धोरणाची काटेकोर व तंतोतंत पालन करण्याबाबत आदेश पारित करण्यात आले. या सर्व बाबी विचारात घेऊन पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक उपलब्धता करून देणारी यंत्रणा उचित कार्यवाही करणार व दर्जेदार इंग्रजी माध्यम शिक्षक पुरवले जाणार, हे अपेक्षित असताना शासकीय धोरण, विभागाचे आदेश व सन्माननीय शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शिक्षण बळकटीकरणाच्या आदर्श धोरणाला शिक्षण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच केराची टोपली दाखवत कुठलीही कार्यवाही केली नाही.
शिक्षकांसाठी सुवर्ण संधी! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भरती सुरू!👇
https://davandi.in/2024/03/17/pcmc-shikshak-recruitment-2024-golden-opportunity-for-teachers-recruitment-for-seats-in-pimpri-chinchwad-municipal-corporation-has-started/
परिणामी शाळांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षक मिळणार या पालक व विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. व खाजगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमध्येही मोफत इंग्रजी शिक्षण मिळणार ही घोषणा धुळीस मिळाली. या बाबी विचारात घेऊन आपण पालक व विद्यार्थीहिताचा विचार करून त्वरित आदेश पारित करावेत, व शिक्षक निवडीच्या पुढील फेरीत प्राधान्याने इंग्रजी माध्यम शिक्षकाची उपलब्धता करून द्यावी ही विनंती.*
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼 https://chat.whatsapp.com/DNAqWuHUf77JxQyX215Xoj
This post was last modified on %s = human-readable time difference 4:38 am