X

Talathi Bharti Exam 2023 : तलाठी भरती परीक्षेचा घोळ थांबेना! सर्व्हर डाऊन झाल्यानं लाखो परीक्षार्थी बसून

Talathi Bharti Exam 2023: तलाठी भरती परीक्षेच्या पाचव्याच दिवशी दुसरा गोंधळ; विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण
तलाठी पदभरतीच्या जाहिराती आल्यापासूनच अनेक ठिकाणी गोंधळ सुरु आहे. उपलब्ध असलेल्या जागा आणि लाखात आलेल्या अर्जाची संख्या पाहता तलाठी पदाला अनन्य महत्व आलेले आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. सध्या विविध ठिकाणी पदभरती परीक्षा सुरु झाली आहे.

सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. राज्यातील नागपूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर ह्या परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. लाखो उमेदवार सकाळपासून अस्वस्थतेत आहेत. नाशिकच्या परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला.

हे ही वाचा : – Talathi bharti: तलाठी भरती परीक्षेचा उडाला गोंधळ! तब्बल 12000 विद्यार्थ्यांना नाही देता आली परीक्षा…..

आज, २१ ऑगस्ट २०२३ रोजी परीक्षेच्या पाचव्याच दिवशी ऑनलाइन परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. परीक्षा सुरू होण्याआधीच सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना वाट पाहायला लागली . राज्यातील नागपूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर या केंद्रांवर सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

आता सर्व्हर रिसेट होण्यास सुरुवात झाली असून खोळंबलेले परीक्षार्थी वाट पाहत आहेत.

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

This post was last modified on August 21, 2023 9:50 am

Davandi: