- पुणे जिल्ह्यांतून सर्वाधिक 1,14,684 अर्ज दाखल
- वाशिम जिल्ह्यांतून सर्वांत कमी 2,636 अर्ज दाखल
- राज्यभरातून एकूण 10,41,713 अर्ज दाखल
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत 4,644 जागांसाठी तलाठी भरतीसाठी अर्ज मागण्यात आले होते. या भरतीसाठी राज्यभरातून एकूण 10,41,713 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यांतून सर्वाधिक 1,14,684 अर्ज दाखल झाले आहेत. तर वाशिम जिल्ह्यांतून सर्वांत कमी 2,636 अर्ज दाखल झाले आहेत.
१७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेचे नियोजनही करण्यात आले आहे.
तलाठी भरती परीक्षेसाठी सर्वाधिक अर्ज दाखल झालेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर आहे. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक एक लाख १४ हजार ६८४, रायगड जिल्ह्यातून १ लाख ५३७, नाशिक जिल्ह्यातून ६८ हजार ३८, अहमदनगर जिल्ह्यातून ६१ हजार ६३३, सोलापूर जिल्ह्यातून ५८ हजार ९७७, नागपूर जिल्ह्यातून ५७ हजार ८७२, चंद्रपूर जिल्ह्यातून ५६ हजार ९३० अर्ज दाखल झाले.
हे ही वाचा : – Job Udate : १० वी पास उमेदवारांना खुशखबर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !पदासाठी भरती सुरु
तर सर्वांत कमी अर्ज दाखल झालेल्या जिल्ह्यांमध्ये वाशिम जिल्ह्यातून २ हजार ६३६, मुंबई शहरातून ३ हजार ७९३, अकोला जिल्ह्यातून ६ हजार ४०४ मुंबई उपनगरातून ७ हजार ६८९, लातूर जिल्ह्यातून ८ हजार ३१, गडचिरोली जिल्ह्यातून ९ हजार २०, गोंदिया जिल्ह्यातून ९ हजार ३३० अर्ज दाखल झाले.
हे ही वाचा : – Current Affairs : तलाठी भरती प्रश्नसंच 2022/23
अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये पुरुष उमेदवारांची संख्या 7,23,558 तर महिला उमेदवारांची संख्या 3,18,155 आहे. सर्वाधिक अर्ज दाखल केलेल्या वयोगटामध्ये 21 ते 25 वर्षे वयोगटाचा समावेश आहे. या वयोगटातील उमेदवारांची संख्या 3,75,255 आहे. सर्वाधिक अर्ज दाखल केलेल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये पदवीधर या पात्रतेचा समावेश आहे. या पात्रतेतील उमेदवारांची संख्या 7,31,037 आहे.
This post was last modified on August 16, 2023 6:58 am